मुंबई : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) पहिला आठवडा फारच रोमांचक ठरला आहे. यंदाच्या सीझनच्या पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी पडल्याचं दिसून आलं. निक्की तांबोळी हिचा तर अनेक सदस्यांसोबत वाद झाला. बिग बॉस मराठीच्या घरात यंदाचे स्पर्धक एकापेक्षा एक वरचढ ठरताना पाहायला मिळत आहे. यंदा बिग बॉस मराठीचा सीझन रितेश दादाच्या (Riteish Deshmukh) स्टाईलमध्ये पाहायला मिळणार आहे. यंदा 'वीकेंडची चावडी' नाही तर 'भाऊचा धक्का' पाहायला मिळणार आहे.


बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची शाळा घेणार रितेश भाऊ


यंदा बिग बॉस मराठीचा होस्ट रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आहे. याआधी शोचे होस्ट महेश मांजरेकर होते, जे वीकेंडच्या चावडीवर स्पर्धकांची शाळा घ्यायचे. मात्र, यंदाचा सीझन रितेश दादाच्या स्टाईलमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदा वीकेंडच्या चावडीची जागा भाऊच्या धक्कायने घेतली आहे. रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांचा पंचनामा करताना दिसणार आहे. शनिवारी यंदाच्या सीझनचा पहिला भाऊचा धक्का भरणार आहे. या भाऊच्या धक्क्यावर कोणत्या स्पर्धकांचा लागणार आणि कोणत्या स्पर्धकांची लागणार, हे आता पाहावं लागणार आहे.


यंदाचा सीझन रितेश दादाच्या स्टाईलने


रितेश देशमुखचा लयभारी अंदाज आणि स्पर्धकांचा कल्ला यामुळे यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या  सीझनची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक 'बिग बॉस'च्या चक्रव्यूव्हमध्ये शिरले आहेत. रितेश देशमुखच्या एन्ट्रीमुळे यंदा बिग बॉसचा सीझन गाजणार हे स्पष्ट झालं होतं. पण, आता भाऊच्या धक्क्यावर घरातील कोणत्या स्पर्धकांची  वाजणार हे पाहण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. 


बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार रितेश भाऊंचा धक्का






बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची नावे


यंदा बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अभिनेता निखिल दामले, कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर, विनोदवीर पंढरीनाथ कांबळे, अभिनेत्री योगिता चव्हाण, अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, गायक अभिजित सावंत, छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दराडे, मुंबईची बार्बी इराना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण हे स्पर्धक आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : निक्कीसोबत केमिस्ट्री की आणखी वेगळा प्लॅन? 'बिग बॉस' जिंकण्यासाठी अरबाज पटेलची रणनीती काय?