मुंबई : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) नव्या पर्वाला सुरुवात झाली असून सुरुवातीपासूनच हा शो चर्चेत आहे. यंदा बिग बॉस मराठीच्या घरात एकापेक्षा एक वरचढ स्पर्धक असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री, गायक, सोशल मीडिया एन्फ्लुएंसर सर्व सदस्य प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. रिअॅलिटी शोचा स्टार आणि स्प्लिट्सविलाची जान म्हणजेच अरबाज पटेल 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. अरबाज पटेलने आपल्या स्टाईल आणि स्वॅगने अनेकांना घायाळ केलं. अरबाजचे अनेक म्युझिक अल्बम देखील झळकला आहेत. अरबाज पटेल आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात कल्ला करताना दिसत आहे. 


निक्कीसोबत केमिस्ट्री की आणखी वेगळा प्लॅन? 


हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या निक्की तांबोळीसह अनेक मुलींना अरबाजने आपल्या लूकने घायाळ केलं आहे. पण अरबाजची जिंकण्याची एक खास रणनीती आहे. 'बिग बॉस मराठी'बद्दल बोलताना अरबाज पटेल म्हणाला,"आपल्या मराठी 'बिग बॉस'मध्ये मी सहभागी झालो आहे.आता राडा होणार. तंटा नाय तर घंटा नाय तर चला करुया राडा. मला 'बिग बॉस मराठी'मध्ये पाहण्याचं माझ्या आईचं स्वप्न होतं. 'बिग बॉस'मध्ये मोठी स्पर्धा असते. मुळात जिथे स्पर्धा तिथे अरबाज पटेल पण आलाच. स्प्लिट्सविलामध्ये मी खूप राडा केला होता. आता 'बिग बॉस मराठी'मध्येही मी राडा करताना दिसून येणार आहे". 


'बिग बॉस' जिंकण्यासाठी अरबाज पटेलची रणनीती काय?


दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात असलेला अरबाज पटेल सध्या निक्की तांबोळीमुळेही चर्चेत आहे. प्रेक्षकांनी निक्की आणि अरबाजची मैत्री आवडताना दिसत आहे. या मैत्रीचं पुढे काय होणार, हे येणाऱ्या काळातच कळणार आहे. ते पाहण्यासाठी आता प्रेक्षकही आतुर झाले आहेत.






100 दिवस नो मोबाईल नो सोशल मीडिया : अरबाज पटेल


फोन आणि सोशल मीडियाच्या न वापराबद्दल अरबाज पटेल म्हणाला, "स्प्लिट्सविलामध्ये असताना 95 दिवस मी फोन आणि सोशल मीडियापासून दूर होतो. आता इथे पण मी फोन, सोशल मीडियापासून दूरच असणार आहे. 'बिग बॉस'मध्ये जाण्याचं मी ठरवलं तेव्हा माझ्या आईला अश्रू अनावर झाले होते. आता मला 'बिग बॉस'मध्ये पाहतानाही आईला रडू येत असेल. मी घरात जाण्याआधी शेवटचा फोनदेखील आईला केला होता. आता आई आणि माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. माझ्या घरातला मी कर्ता मुलगा आहे. आता 'बिग बॉस मराठी'च्या घरातही माझंच अधिराज्य असणार". 


जिंकण्याची रणनीती कशी असणार?


जिंकण्याच्या रणनीतीवर भाष्य करताना अरबाज म्हणाला होता, "घरातला मी कर्ता मुलगा असल्याने मला माहिती आहे की, काय केल्यावर मी कॅप्टन बनेल. मी कॅप्टन झालो, तर मला नक्की आवडेल आहे. प्रेक्षकांचं मला वेड्यासारखं प्रेम आणि सपोर्ट हवाय" असंही त्याने ग्रँड प्रीमियरच्या वेळी म्हटलं होतं.