Bigg Boss Marathi Season Finale Week : बिग बॉस मराठी पाचव्या सीझनचा सध्या शेवटचा आठवडा सुरु आहे. 6 ऑक्टोबरला यंदाच्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. यंदाच्या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या विजेतापदाच्या शर्यतीत अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार हे सदस्य आहेत. ग्रँड फिनाले ट्रॉफी कुणाला मिळणार याकडे सर्वांच्या लागल्या आहेत. बिग बॉसच्या घरात आज मिड वीक इविक्शन पार पडणार आहे.


बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच होणार मिड वीक एलिमिनेशन


बिग बॉस मराठीने आजच्या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये बिग बॉसच्या घरात आज डीजे क्रेटेक्स येणार असल्याचं दिसत आहे, त्याशिवाय आज मिड वीक इविक्शन होणार असल्याचंही बिग बॉस सांगत आहेत. गेल्या आठवड्यात पॅडी कांबळेने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला तेव्हा बिग बॉसने घोषणा केली होती की, या आठवड्यात मिड वीक एलिमिनेशन होणार आहे.


यंदाच्या सीझनचं पहिलं मिड वीक इविक्शन






आज बिग बॉसच्या घरातील एका सदस्याचा प्रवास संपणार आहे. आज कोणत्या सदस्याचं बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार हे जाणून घेण्यासाठी सर्वांच्या नजरा आजच्या भागाकडे लागल्या आहेत.


तुमच्या आवडत्या सदस्याला जिंकवण्यासाठी व्होट करा


महाराष्ट्रातील जनतेसोबतच अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी देखील आपल्या लाडक्या सदस्याला सपोर्ट करत आहे. तेव्हा तुम्हीही तुमच्या लाडक्या सदस्याला सपोर्ट करत त्याला व्होट करायला विसरु नका.






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


'गुलिगत सूरज'ला सुप्रिया ताई अन् दादांचा फुल्ल पाठिंबा, बारामतीकर सूरज चव्हाणला व्होट करण्याचं आवाहन