Bhaucha Dhakka Riteish Deshmukh : बिग बॉस मराठीमध्ये हा आठवडा फारच रोमांचक ठरला. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात नवीन समीकरण जुळल्याचं पाहायला मिळालं. काही मोठी भांडणं आणि टास्कमधील राडेही दिसून आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात घडलेल्या घडामोडींवर रितेश भाऊ काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर आज काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 


भाऊच्या धक्क्यावर सगळ्यांचा हिशोब चुकता होणार


बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात मानकाप्या आला, अरबाज आणि निक्कीचा वाद, वैभव आणि निक्कीचं भांडणही पाहायला मिळालं. याशिवाय अभिजीत-निक्कीची जोडी जमली आणि निक्कीविरोधात अभिजीतने स्टँड घेतला. अशा प्रकारे हा आठवडा फारच रोमांचक ठरला. पाताळलोकच्या टास्कमध्येही अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. यानंतर आता रितेश भाऊच्या धक्क्यावर कोणत्या स्पर्धकांची कामउघडणी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






रितेश भाऊच्या भूमिकेकडे बिग बॉस प्रेमींचं लक्ष


बिग बॉस मराठी भाऊच्या धक्क्याचा नवीन प्रोमो समोर आला आहे. आजच्या एपिसोडचा नवीन प्रोमो आऊट झाला असूव प्रोमोमध्ये रितेश देशमुख बोलतोय, "बिग बॉसच्या घराला भूतानं झपाटलं, काहींच्या अंगात जिंकण्याचं वारं भरलं, याच नादात सगळ्यांचंच काहीतरी चुकलं, सगळ्यांचा हिशेब चुकता होणार"


अरबाज-निक्कीच्या 'त्या' व्हिडीओवर रितेश भाऊ काय बोलणार? 


या आठवड्यात अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत बरेच चढउतार पाहायला मिळाले. आठवड्याच्या सुरुवातीला दोघांच्या मैत्रीच्या नात्यात फूट पडली. नेहमी एकत्र दिसणारे निक्की आणि अरबाज आठवड्याच्या सुरुवातीला एकमेकांशी भांडताना दिसले. आठवडा संपताना मात्र दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसले. अरबाज आणि निक्कीचा एकमेकांना मिठी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्रेक्षकांचा संताप अनावर झालेला पाहायला मिळाला.


अरबाज-निक्कीचा 'तो' व्हिडीओ






 


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi 5 : आर्या, अर्र येडी का खुळी तू, हिला सपोर्ट तरी कसा करावा; नेटकऱ्यांचा संताप अनावर