Bigg Boss Marathi 5 Latest Update Apurva Nemlekar : छोट्या पडद्यावर कायम चर्चेत असलेला 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) या रिएल्टी शोची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. यंदा 'बिग बॉस मराठी'चे पाचवे पर्व असणार आहे. या सीझनचा होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याऐवजी  रितेश देशमुख असणार आहे. बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा कार्यक्रम होस्ट करणार असल्याने चाहत्यांमध्ये बिग बॉस मराठीच्या या सीझनबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या आधीच्या पर्वातील बिग बॉसमधील स्पर्धक अपूर्वा नेमळेकरच्या कमेंटने लक्ष वेधले आहे. 






कलर्स मराठी आणि JioCinema वर 'बिग बॉस मराठी' चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेळी 'बिग बॉस मराठी'चे होस्टिंग बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. कलर्स मराठीच्या घोषणेनंतर बिग बॉस मराठीचे चाहते उत्सुक दिसले. तर, दुसरीकडे बिग बॉसमध्ये याआधीच्या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांनी शोचा नवा होस्ट रितेश देशमुखचे स्वागत करताना कमेंट्स केल्या आहेत.


अपूर्वा नेमळेकरची कमेंट चर्चेत...


'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनमध्ये अपूर्वा नेमळेकरने टॉप 2 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले होते. आपल्या सौंदर्याने आणि अदांनी छोटा पडद्यावरील मालिका गाजवणाऱ्या अपूर्वाने डावपेच, परफॉर्मेन्सने बिग बॉस मराठीच्या घरात आपली हुकूमत निर्माण केली होती. अपूर्वासोबत इतर स्पर्धकांचे झालेले वादही गाजले. आता अपूर्वाने बिग बॉस मराठीच्या नव्या होस्ट बाबत कमेंट करताना इन्स्टाग्रामवर स्टोरीतून आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


अपूर्वाने काय कमेंट्समध्ये काय?


कलर्स मराठीने आज बिग बॉस मराठीचा व्हिडीओ रिलीज केल्यानंतर अपूर्वाने कमेंट केली आहे. तिने आपल्या कमेंट्स मध्ये म्हटले की, फायनली... इसको बोलते है होस्ट.... रितेश सर वेलकम...




अपूर्वाने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये कलर्स मराठीने लाँच केलेला टीझर शेअर करत कॅप्शन देताना म्हटले की, अखेर महाराष्ट्रातील एका सर्वोत्तम घरासाठी एक सर्वोत्तम होस्ट मिळाला आहे.




अपूर्वाला युजर्सने म्हटले की...


अपूर्वाच्या कमेंट्सवर युजर्सकडूनही प्रतिक्रिया समोर आल्या. एका युजरने बघा महेश सर, तुम्ही चांगले होस्ट नव्हता असे म्हणते, असे सांगत त्याने महेश मांजरेकर यांना एक टॅग केले आहे. तर, एका युजरने महेश मांजरेकरच चांगले होस्ट असल्याचे म्हटले. काही युजर्सने अपूर्वावर टीका केली. तुझ्यासारख्या स्पर्धकाचा महेश मांजरेकर यांनी माज उतरवला होता म्हणून का...? तर एकाने म्हटले की, तुझ्यासारख्या स्पर्धकाची वाट लावायला महेश मांजरेकरच हवे. 


इतर संबंधित बातमी...