Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आता कोणता स्पर्धक या स्पर्धेत बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. यंदाचं पर्व जिंकणाऱ्या स्पर्धकाला लाखो रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात 16 स्पर्धक सहभागी झाले होते. आता हे पर्व संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून सध्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. येत्या 8 जानेवारीला या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. बिग बॉसचं चौथं पर्व जिंकणाऱ्या विजेत्याला किंवा विजेतीला 15 लाखांचं बक्षीस मिळणार आहे.
टीआरपीच्या शर्यतीत 'बिग बॉस मराठी' पडलं मागे
टीआरपीच्या शर्यतीत 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व मागे पडलं आहे. या कार्यक्रमाला फक्त 2.8 रेटिंग मिळाले आहे. बिग बॉस प्रेक्षकांच्या पसंतीस पडावा यासाठी निर्माते वेगवेगळे ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तरीही हा कार्यक्रम आपली जादू दाखवण्यात कमी पडतो आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक प्रेक्षकांना आवडत नसल्याने त्याचा परिणाम थेट कार्यक्रमाच्या टीआरपीवर होत आहे.
बिग बॉसचं चौथं पर्व जिंकणाऱ्या विजेत्याला किंवा विजेतीला 15 लाखांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळणार आहे. त्यामुळे आता यंदा कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा जवळ आल्याने चाहते आपल्या लाडक्या स्पर्धकाला जिंकण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत करत आहेत.
महाअंतिम सोहळा कधी रंगणार?
'बिग बॉस मराठी 4'च्या महाअंतिम सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता लवकरच घरातील स्पर्धकांचे 100 दिवस पूर्ण होणार आहेत. 'बिग बॉस मराठी 4'चा महाअंतिम सोहळा 8 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता रंगणार आहे.
संबंधित बातम्या