Ruchira Jadhav On Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 4) एक वेगळा चाहतावर्ग आहे. पण दिवसेंदिवस बिग बॉस मराठीची क्रेझ कमी होताना दिसत आहे. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कुठेतरी कमी पडतो आहे. दर आठवड्यात बिग बॉसच्या खेळात कोणाला तरी बाहेर पडावं लागत असतं. त्याप्रमाणे या आठवड्यात 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम माया अर्थात रुचिरा जाधवला (Ruchira Jadhav) घराबाहेर पडावं लागलं आहे. रुचिरा घराबाहेर पडल्याने आता रोहितचं काय होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 


प्रसाद आणि रुचिरा डेंजर झोनमध्ये होते. यातून रुचिरा जाधवला घर सोडून जावे लागले. घर सोडल्यानंतर रुचिराने एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे,"खूप काही करायचं होतं.
खूप काही बोलायचं होतं. गोष्टी अर्धवट राहिल्या याची खंत आहे. मी खरी राहिले. मी खरी खेळले, याचा अभिमान आहे. तुम्ही सगळ्यांचे प्रेम पाहिजे म्हणजे पाहिजे...खूप प्रेम..तुमचीच रुचिरा". 






बिग बॉस मराठीची या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. 'शेतकरीच नवरा हवा' या मालिकेतील कलाकार रुचा गायकवाड, प्रदीप घुले आणि निर्माती श्वेता शिंदे बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना भेटले. तर सदस्यांसोबत 'गद्दार कोण' हा खास खेळ रंगला. ज्यात रुचिराने अपूर्वाला तर विकासने किरण माने यांना गद्दार ठरवले. 


कोणी कोणाला गद्दार ठरवलं?


विकासच्या कृतीमुळे किरण माने खूप दुखावले आणि त्यांनी स्वतःलाच गद्दार म्हणून टॅग दिला. तर यशश्रीने तेजस्विनीला गद्दार ठरवले. समृद्धीने अमृता धोंगडेला तर अक्षयने रोहितला गद्दार ठरवले. प्रसादने किरणला तर अमृता धोंगडेने प्रसादला गद्दार ठरवले. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये चुगली थद्वारे आलेल्या चुगलीमुळे यशश्री अपूर्वा, अक्षय आणि अमृता देशमुखवर चांगलीच भडकली. 


'आरोपी कोण' या टास्कमध्ये प्रसादला आरोपी ठरवण्यात आले आणि त्याला शिक्षादेखील सुनावली. ज्यामध्ये प्रसादने अमृता देशमुखसोबत डान्स करावा असे सांगण्यात आले. पुढच्या आठवड्यात कोण राहील? कोण जाईल? कोण होईल नॉमिनेट? कोण होईल सेफ? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 
  
 संबंधित बातम्या


Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात रंगणार अतरंगी टास्क; घरातील एका सदस्याची होणार एक्झिट