Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या (Big Boss Marathi 4) खेळाची उत्सुकता वाढत चालली आहे. या आठवड्यात घरात #नॉमिनेशन कार्य पार पडले. त्यानुसार घरातील काही सदस्य घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले. मात्र, घरात आता सोसल तितकंच सोशल हे साप्ताहिक कार्य पार पडतंय. या कार्यात कोणते सदस्य कॅप्टन्सीच्या शर्यतीत उभे राहणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


सोसल तितकंच सोशल साप्ताहिक कार्य 


सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. या ठिकाणी व्हायरल होण्यासाठी लोक अनेक युक्त्या करतात. मात्र, त्यापैकी काहीच लोक व्हायरल होतात तर काही या शर्यतीत मागे राहतात. याच पार्श्वभूमीवर बिग बॉसच्या घरात सोसल तितकंच सोशल हे साप्ताहिक कार्य सुरु झालं आहे. या साप्ताहिक कार्यात उमेदवारांना वेगवेगळ्या चॅलेंजेसना सामोरे जाऊन कार्यात टिकून राहणाऱ्या स्पर्धकांना कॅप्टन्सी उमेदवारीची संधी मिळणार आहे. एका टीममधल्या सदस्यांना दुसऱ्या टीममधील सदस्यांना चॅलेजेस देऊन कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून बाद करायचे आहे. तर, दुसऱ्या टीममधील सदस्यांना शेवटच्या फेरीपर्यंत टिकून कॅप्टनपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. 


दोन टीममध्ये जिंकण्याची शर्यत 


या कार्यासाठी टीमचे दोन विभागात विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार, तेजस्विनी, किरण, यशश्री, अमृता देशमुखे, धोंगडे, प्रसाद हॅश टॅग नॉमिनेशन कार्य समाप्त. टीम A मध्ये अपूर्वा, स्नेहलता, रोहित, विकास, तेजस्विनी, प्रसाद आहेत. तर, टीम B मध्ये किरण, अमृता धोंगडे, समृद्धी, अमृता देशमुख, यशश्री आणि अक्षय हे सदस्य आहेत. 


काल टीम बी मधील सदस्य चॅलेंजर्स होते तर आज टीम ए मधील सदस्य चॅलेंजर्स असणार आहेत. आता या कार्यात नेमके कोण दोन उमेदवार या शर्यतीत जिंकून कॅप्टन्सीची उमेदवारी मिळवतील हे पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे. 


पाहा व्हिडीओ : 



महत्वाच्या बातम्या : 


Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरामधून रुचिरा जाधव बाहेर!; चाहते म्हणाले,"आता रोहितचं काय होणार?"