Kaun Banega Crorepati 14 Premier Date : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या लोकप्रिय कार्यक्रमाचा प्रीमियर 7 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी प्रीमियरला हजेरी लावणार आहेत. 


'कौन बनेगा करोडपती' कधीपासून होणार सुरू? 


सोनी टीव्हीने सोशल मीडियावर नुकताच 'कौन बनेगा करोडपती 14' या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमो शेअर करत त्यांनी प्रीमियरची तारीखदेखील जाहीर केली आहे. 7 ऑगस्ट 2022 रोजी 'कौन बनेगा करोडपती 14'चा प्रीमियर होणार आहे. 'कौन बनेगा करोडपती 14' या कार्यक्रमाचा पहिला आठवडा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात रंगणार आहे. 


'कौन बनेगा करोडपती'च्या प्रीमियरला आमिर खानची हजेरी






'कौन बनेगा करोडपती'चा प्रीमियर खूपच खास असणार आहे. प्रीमियरला आमिर खान उपस्थित राहणार आहे. आमिरला 2010 साली प्रदर्शित झालेल्या '3 इडियट्स' (3 Idiots) या सिनेमासाठी पद्मभूषण (Padma Bhushan) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर आमिर 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. 


'कौन बनेगा करोडपती 14' चा नवा नियम


'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात स्पर्धक जर 1 कोटीसाठीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार झाला आणि ते उत्तर चुकलं तर स्पर्धकाला फक्त 3 लाख 20 हजार मिळत असतात. पण 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला फक्त 75 लाख मिळणार आहेत. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यंदाच्या पर्वात खास 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. 


संबंधित बातम्या


KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती'च्या पहिल्या भागात आमिर खान होणार सहभागी; हॉट सीटवर बसून देणार उत्तर


KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; 'असा' असेल बदललेला नियम