Katrina Vicky Wedding Card : कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) लग्नाच्या बेडीत अडकायला अवघे काही तास राहिले आहेत. दरम्यान त्यांच्या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांची लग्नपत्रिका पेस्टल गुलाबी रंगाची असून त्यावर फुलांची बॉर्डर आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशलचे नाव सोनेरी रंगात छापलेले आहे. 


लग्नपत्रिकेत लग्नसोहळ्याचे ठिकाण आणि तारीख नमूद केलेली आहे. विकी आणि कतरिना 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. बरवाडा किल्ल्याला खास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.






कतरिना आणि विकीच्या लग्नात 'या' अटींचा समावेश
कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे. तसेच पाहुण्यांना लग्नासंबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही. 


संबंधित बातम्या


Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: हनिमून इन मालदीव... विकी कौशल-कतरिना कैफ लग्नानंतर हनिमूनसाठी मालदीव गाठणार


Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी-कतरिनाचं Kangana Ranaut ने केलं कौतुक, म्हणाली...


Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : कतरिना आणि विकीने वेडिंग प्लानिंगसाठी 'या' अभिनेत्रीची केली कॉपी?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha