Raqesh Bapat Hospitalised: अभिनेता राकेश बापटला (Raqesh Bapat) ला नुकतेच बिग बॉसचे (Bigg Boss 15) घर सोडावे लागले आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल होताच त्याच्यावर लगेचच उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे राकेशला बिग बॉसच्या घराचा ताबडतोब निरोप घ्यावा लागला. 

Continues below advertisement

बिग बॉसच्या घरातून राकेश बापट बाहेरराकेशची नुकतीच वाइल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली होती. त्याच्यासोबत नेहा भसीननेदेखील बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली होती. राकेशच्या एन्ट्रीमुळे शमिता शेट्टीला खूप आनंद झाला होता. शमिता बिग बॉसच्या घरात राकेशला मिस करत होती. त्यामुळे बिग बॉसच्या घरात झालेली राकेशची एन्ट्री शमितासाठी नक्कीच खास होती. बिग बॉसने दोघांसाठी रोमॅंटिक डेटदेखील आयोजित केली होती. बिग बॉसच्या घरात दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना खूप आनंदी दिसत होते.

 किडनी-स्टोनच्या आजाराने रुग्णालयात दाखल8 नोव्हेंबरच्या रात्री राकेशला किडनीमध्ये स्टोनला त्रास होऊ लागला. हा त्रास त्याला सहन करणे कठीण झाले होते. त्यामुळे त्याला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. राकेश बिग बॉसच्या घरातून सध्या बाहेर पडला आहे. त्यामुळे तो पुन्हा घरात जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राकेश आणि शमिताची भेट बिग बॉस ओटीटीमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री पाहायला मिळाली.

राकेश बापट बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यामुळे शमिता शेट्टीला धक्का बसला आहे. शमिताचे चाहतेदेखील नाराज झाले आहेत. राकेश लवकर बरा व्हावा यासाठी शमिता प्रार्थना करत असते. राकेश लवकर बिग बॉसच्या घरात यावा अशी शमिताची इच्छा आहे.