Bigg Boss 15 Wild Card Entry: सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 15' दिवसेंदिवस मनोरंजनात्मक होत आहे. या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांनादेखील खिळवून ठेवले जात आहे. बिग बॉस ओटीटीमधील राकेश बापट (Raqesh Bapat) आणि नेहा भसीन (Neha Bhasin) यांनी बिग बॉसच्या घरात नुकतीच वाइल्ड कार्ड एन्ट्री केली होती. आता बिग बॉस ओटीटीमधील आणखी एक स्पर्धक बिग बॉसच्या घरात जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'ये दिल आशिकाना' फेम करण नाथ (Karan Nath) बिग बॉसच्या घरात जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
करण नाथ 'बिग बॉस 15' कार्यक्रमात स्पर्धक म्हणून जाणार अशा चर्चांना सध्या उधान आले आहे. निर्माते आणि चॅनल सध्या करणसोबत बोलणी करत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाइल्ड कार्ड एन्ट्री करत करण बिग बॉसच्या घरात लवकरच जाऊ शकतो. बिग बॉस ओटीटीमध्ये करण आणि प्रतिक सहजपालची जोडी दिसून आली होती. त्यामुळे आता करण आणि प्रतिक पुन्हा एकदा एकत्र येत प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकतात.
करण नाथ प्रतिकला पाठिंबा देत आहे. एका मुलाखतीदरम्यान करण म्हणाला, "प्रतिक सहजपालला करण कुंद्राने मारहान केल्याचे ऐकताच मला खूप राग आला होता". करण कुंद्राला फटकारताना नाथ म्हणाला,"मला वाटते करण कुंद्रा चुकीचा होता. टास्क दरम्यान तो बचाव करत होता. पण त्याला बचाव म्हणत नाही. त्याला फक्त हे दाखवायचं होतं की तो प्रतिकपेक्षा शारीरिकदृष्ट्या अधिक चांगला आहे. माझ्या लहान भावाला मारहाण करतानाचे दृश्य बघताना मला खूप वाईट वाटलं होतं. त्यादरम्यान मी जर घरात असतो तर मी असं होऊच दिलं नसतं". करण नाथजर बिग बॉस 15 मध्ये सहभागी झाला तर प्रेक्षकांना पुन्हा एकदा करण आणि प्रतिकची मैत्री पाहायला मिळणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha