Kangana Ranaut : कंगना हिमाचलमधून पंजाबमध्ये येत असताना शेतकऱ्यांनी तिच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप कंगना रणौतने नुकताच केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. मोदींच्या त्या घोषणेनंतर कंगना रणौतने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कृषी कायद्याच्या निर्णयावर भडकलेली कंगना भारताला 'जिहादी देश' असे म्हणाली होती. त्यानंतर कंगना रणौतनं शेतकरी आंदोलनाला 'खलिस्तानी आंदोलन' म्हटलं होतं. 


कंगना रणौतच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळेच पंजाबमधील शेतकरी तिला पंजाबमध्ये प्रवेश करू देत नाही आहेत. "शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांविरोधात केलेल्या टिप्पणीबद्दल कंगनाने शेतकऱ्यांची माफी मागायला हवी", असे शेतकरी म्हणाले. दरम्यान कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे,"मी पंजाबमध्ये प्रवेश करत असताना एका जमावाने माझ्या कारवर हल्ला केला. ते शेतकरी असल्याचे सांगत आहेत".


कंगना रणौतने जमावाने घेरल्याचे व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. त्या व्हिडीओमध्ये कंगना म्हणाली,"पंजाबमध्ये पोहोचताच जमावाने माझ्या कारवर हल्ला केला आहे. हे लोक स्वतःला शेतकरी असल्याचे म्हणवून घेत आहेत. देशात सुरक्षा नसेल आणि अशा पद्धतीच्या घटना घडत असतील, तर हे खूप भयंकर आहे". 


काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले. मोदींच्या या घोषणेनंतर कंगना रनौतने शीख समुदयाला खलिस्तानी म्हणत एक वादग्रस्त पोस्ट केली होती. कंगनाचं ट्विटर अकाउंट याआधीच हटवण्यात आलं असलं तरी तिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ही वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती. ज्यानंतर तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली असून आता तिला थेट विधानसभेने समन्स बजावलं आहे. आमदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या नेतृत्वाखाली समितीने कंगनाच्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता तिला हजर राहण्यास सांगितले आहे. 


कंगनाचे आगामी सिनेमे
'इमर्जन्सी', 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिड्डा', 'तेजस', 'धाकड' आणि 'सीता: द इन्कारनेशन' हे कंगना रणौतचे आगामी सिनेमे आहेत. 


संबंधित बातम्या


जीवे मारण्याच्या धमकीनंतर कंगना म्हणते, सोनियाजी, तुम्हीही एक महिला, इंदिरा गांधीही दहशतवादाविरुद्ध लढल्या


Kangana Ranaut Reacts : पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ, कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया


Kangana Ranaut Summoned: कंगना रनौतला दिल्ली विधानसभेकडून समन्स, 6 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha