Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरात कालच्या भागात स्नेहाला 'कॅप्टन' पद मिळाले असून बिग बॉसच्या घराचा ताबा सध्या स्नेहा वाघकडे आहे. आज बिग बॉसच्या चावडीवर विकेण्डच्या डावात महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेताना दिसून येणार आहेत. प्रोमोमध्ये मांजरेकर विशालला ओरडताना दिसून येत आहेत. तर आज बिग बॉसच्या घरात एका नव्या सदस्याची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. 


बिग बॉसच्या घरात मागच्या आठवड्यात अनेक गोष्टी घडल्या. आदिश वैद्यला घराचा निरोप घ्यावा लागला. त्यानंतर बिग बॉसच्या घराचे रुपांतर अद्भूत नगरात झाले होते. त्यात बिग बॉसने स्पर्धकांना 'स्वर्ग की नरक' हे नॉमिनेशन कार्य दिले होते. या नॉमिनेशन कार्यामुळे घरातील सदस्यांना भांडणांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर घरातील स्पर्धकांना बिग बॉसने 'संयमाची ऐशीतेशी' हे साप्ताहिक कार्य दिले होते. या टास्कमध्ये स्पर्धक राक्षस आणि देवदुताच्या भूमिकेत होते. त्यानंतर घरात रंगले ते म्हणजे 'आयना का बायना घेतल्या शिवाय जायना' हा कॅप्टनसी टास्क. जे दोन सदस्य बिग बॉसच्या सूचनेनंतर त्यांनी सांगितलेल्या खोलीत जाऊन सोफ्यावर बसतील तेच सदस्य शक्तीपदक मिळवण्यासाठी उमेदवार असणार आहेत असे बिग बॉसने जाहीर केले होते. त्यानुसार उत्कर्ष आणि विकास हे सदस्य शक्तीपदकासाठी पात्र ठरले होते. 


Nawazuddin Siddiqui Leave OTT: दर्जेदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'नवाजुद्दीन सिद्दीकी'चा ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन सन्यास!


बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मागील आठवड्यात एक आगळवेगळं साप्ताहिक कार्य सुरू होतं. अद्भुत नगरावर ताबा मिळविण्यासाठी राक्षस आणि देवदूतांमध्ये हे युध्द सुरू झालं होतं. आदिश वैद्यची बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. त्यानंतर मी आता बिग बॉसच्या घरात धुमाकुळ घालायला येत आहे असं म्हणत एक स्पर्धक मंचावर नृत्य करताना दिसून येत आहे. या नव्या स्पर्धकाचे नाव अजून गुलदस्त्यात आहे. आज महेश मांजरेकर विशालला ओरडणार आहेत. मागील आठवड्यात विशालने घरातील सदस्यांना त्रास दिला होता. तसेच बिग बॉसच्या घरातदेखील त्याने तोडफोड केली होती. त्यामुळे मांजरेकर त्याची शाळा घेणार आहेत. 


Bhai Ka Birthday Song Teaser: Antim सिनेमातील Bhai Ka Birthday गाण्याचा टीजर प्रदर्शित, Salman Khan आणि Aayush Sharma आमने-सामने


Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरातील साप्ताहिक कार्यात राक्षस आणि देवदूंतामध्ये सुरू झालं युद्ध