Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे एक आगळवेगळं साप्ताहिक कार्य. अद्भुत नगरावर ताबा मिळविण्यासाठी राक्षस आणि देवदूतांमध्ये युध्द सुरू झालं आहे. हे दोघेही स्वत:च्या मूळ स्वभावाशी एकनिष्ठ राहून हे युध्द लढणार असे जरी काल बिग बॉस यांनी जाहीर केले असले तरीसुध्दा हा प्रश्न मनात येतो सदस्य त्यांच्या मूळ स्वभावाशी एकनिष्ठ राहू शकतील? टास्क जिंकण्यासाठी प्रत्येक सदस्य मनापासून प्रयत्न करतात पण कधी कधी ते काय करत आहेत याचं त्यांना भान रहात नाही. असंच काहीसं कालच्या भागात घडले होते. तेच आजच्या भागात सुध्दा घडणार असं दिसून येत आहे. 


नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून बिग बॉस मराठीच्या घरातील जय-विरूची जोडी आता कुठेतरी तुटणार असे वाटत आहे. नॉमिनेशन टास्कपासून या वादाला सुरुवात झाली आहे. आजच्या भागात हा वाद विकोपाला जाऊ शकतो. आजच्या भागात टास्कमध्ये टीम B राक्षस असणार आहे. त्यामुळे आता विशाल आणि विकासच्या संयमाची कसोटी लागणार आहे. विशाल विकासला टास्क सुरू असताना म्हणाला, "सगळ्याचा हिशोब घेतला जाईल". विकासच्या रागाचा विशालला सामोरा करावा लागणार आहे. 


Sherlyn Chopra : Sameer Wankhede यांना शर्लिन चोप्राचा पाठिंबा


'संयमाची ऐशी तैशी' या टास्कमध्ये डेव्हिल बनलेली टीम एक से बडकर एक युकत्या लढवून देवदूत झालेल्या सदस्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण देवदूत बनलेले सदस्य मात्र संयम राखून त्यांचे कार्य पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. आज जय, मीरा आणि तृप्तीताई प्लॅन करताना दिसणार आहेत. 



बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या टास्कमध्ये आज दादूस आणि मीनलच्या वाट्याला देखील येणार आहे कठीण टास्क. घरात सुरू झालेल्या नव्या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याच्या संयमची कसोटी लागते आहे. आज टीम B मधील सदस्य डेव्हिल बनणार असून विशाल त्याच्या डेव्हिल रूपात घरामध्ये बराच हंगामा करताना दिसत आहे. विशालची वेगळीच बाजू या टास्कमुळे प्रेक्षकांना दिसते आहे. विशाल आणि विकासच्या भांडणानंतर आज विशाल दादूसना एक टास्क देताना दिसणार आहे. तर जय आणि सोनाली मीनलला एक मजेदार टास्क देणार आहेत. 


Ranbir Kapoor - Alia Bhatt येत्या डिसेंबरमध्ये अडकणार लग्नबंधनात? आलियाच्या आई म्हणाली...