Bigg Boss Marathi Season 5 : निक्की (Nikki Tamboli) आणि अरबाजमध्ये (Arbaz Patel) भांडणं झाल्यानंतर निक्कीने त्यांच्यामधील भाडणं मिटवण्याचा आज प्रयत्न केला. बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) आजचा दिवस हा अरबाज आणि निक्कीच्या भांडणामुळे गाजला. याआधीही घरात वागण्याचं तारतम्य ठेवलं नसल्यामुळे रितेश भाऊंनी जान्हवीला शिक्षा दिली आहे. पण आता अरबाजचंही वागणं बेताल झाल्यानंतर बिग बॉसने अरबाजलाही शिक्षा सुनावली आहे. 


अरबाज आणि निक्कीच्या भांडणामुळे अरबाजने घरात बरीच आदळाआपट केली. घरातली भांडी आपटली, खुर्ची आपटली. घरातल्यांनीही त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. पण निक्कीमुळे अरबाजचा राग अनावर झाला. त्यामुळे बिग बॉसने अरबाजला शिक्षा सुनावली असून अरबाज या आठवड्यासाठी कॅप्टन पदासाठी दावा करु शकणार नाही.                                  


या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार


पाचव्या आठवड्या बिग बॉसच्या घराबाहेर निक्की, अभिजीत, वर्षा आणि अरबाज हे सदस्य नॉमिनेट झालेत. नॉमिनेशनसाठी मानकाप्या हे कार्य पार पडलं. घरातील सदस्य हे सध्या जोड्यांमध्ये बांधले गेले आहेत. त्यामुळे नॉमिनेशनही जोड्याचं झालं. यामध्ये वर्षा अंकिता ही जोडी आणि निक्की अभिजीत ही जोडी नॉमिनेट झाली.                                                         


घरातील सदस्यांमध्ये वाद


दरम्यान घरातील सदस्यांमध्ये सध्या बरेच राडे सुरु आहेत. कारण निक्कीला तिच्यामागून तिच्याविषयी होणाऱ्या गॉसिपविषयी माहिती झालीये. त्यामुळे तिने ग्रुप A मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अभिजीत आणि ती एकत्र येऊन खेळणार असल्याचं चित्र सध्या घरात आहे. तसेच जान्हवी आणि निक्कीमध्येही टोकाचे वाद होत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय.                   






ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi Season 5 : निक्की, अभिजीत, वर्षा आणि अंकिता; या आठवड्यात कुणाचा खेळ संपणार?