Bigg Boss 18 Contestant List : छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा 'बॉस' रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' लवकरच सुरु होणार आहे. 6 ऑक्टोबरला शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. सलमान खानच्या रिॲलिटी शोमध्ये यंदा कोणते सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून हजेरी लावणार याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बिग बॉस 18 च्या स्पर्धकांची नावे जाणून घेण्यासाठी सध्या प्रेक्षक फार आतूर झाले आहेत. पण, आता बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या पहिल्या स्पर्धकाच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. बिग बॉस सीझन 18 मधील पहिला सदस्य निया शर्मा असणार आहे. 


बिग बॉस 18 मधील पहिली स्पर्धक ठरली


छोट्या पडद्यावरील प्रसिद्धा अभिनेत्री निया शर्मा बिग बॉस सीझन 18 शोची पहिली अधिकृत स्पर्धक बनली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने 'खतरों के खिलाडी 14' च्या ग्रँड फिनालेमध्ये निया शर्मा बिग बॉसमध्ये जाणार असल्याची अधिकृत घोषणा केली. अभिनेत्री निया शर्मा बिग बॉस 18 शोमध्ये सहभागी होणार आहे, ही बातमी ऐकून तिचे चाहते फार खूश झाले आहेत.


अभिनेत्री निया शर्माची बिग बॉसमध्ये एन्ट्री


'लाफ्टर शेफ' होस्ट भारती सिंह आणि निया शर्मा आणि कश्मिरा शाह खतरों के खिलाडी 14 च्या ग्रँड फिनालेमध्ये पाहुण्या म्हणून आल्या होत्या. यावेळी शोमध्ये खूप धमाल झाली. जिथे भारतीने आपल्या कॉमेडीने सर्वांना हसून लोटपोट केलं. दरम्यान, यावेळी रोहित शेट्टीनेही निया शर्मा बिग बॉस शोची पहिली स्पर्धक असल्याचं जाहीर केलं. निया शर्मा बिग बॉसमध्ये जाणार अशी चर्चा बरेच दिवसांपासून होती, पण आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे.


मैत्रिणीसोबत लिपलॉक केल्याने अभिनेत्री ट्रोल


टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्डनेस आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त तिने वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्सही दिले आहेत. निया शर्माचा मैत्रिणीसोबत लिप लॉक करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका होळी पार्टीमध्ये मीडियासमोर बोलताना निया शर्मा हिने सह-कलाकार अभिनेत्री रेहाना पंडित हिला कॅमेऱ्यासमोर किस केलं होतं. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता, ज्यामुळे ती खूप ट्रोलही झाली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


VIDEO : अभिनेत्री तृप्ती डिमरी 5.5 लाख रुपये फी घेऊनही कार्यक्रमाला गैरहजर असल्याचा आरोप, महिलांनी पोस्टरला फासलं काळं