Mannara Chopra : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 17'मध्ये (Bigg Boss 17) मनारा चोप्राने (Mannara Chopra) पहिल्यांदा एन्ट्री घेतली आहे. मनारा ही लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तेलुगू, तामिळ, हिंदी आणि कन्नड सिनेमांत ती काम करते. विशेष म्हणजे प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि परिणीती चोप्राची (Parineeti Chopra) ती चुलत बहीण आहे.
कोण आहे मनारा चोप्रा (Who is Mannara Chopra)
मनारा चोप्राचा जन्म हरियाणातील अंबालामध्ये झाला आहे. तिची आई ज्वेलरी डिझायनर असून वडील वकील आहेत. मनाराने वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतलं आहे. मनारा अभिनेत्री आणि मॉडेल असण्यासोबत फॅशन डिझायनर आहे. दिल्लीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनाराने मुंबई गाठली. मॉडेलिंग करत तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. 40 पेक्षा अधिक जाहिरातींमध्ये तिने काम केलं आहे.
मनाराचा अभिनयप्रवास... (Mannara Chopra Movies)
मनाराने 2014 मध्ये अनुभव सिन्हा यांच्या 'जिद' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. आजवर तिने अनेक तेलुगू, तामिळ, हिंदी आणि कन्नड सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'जिद' या सिनेमानंतर अभिनेत्री दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळाली. थिक्का, दुष्ट, जक्कन्ना या तेलुगू सिनेमांत तिने काम केलं. 'जिद' या सिनेमासह अभिनेत्रीने सीता, दुष्ट, थिक्का, जक्कन्ना, कावल, संदामारुथम, प्रेमा गीमा जांथा नाई अशा अनेक सिनेमांत काम केलं आहे. आता स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मनाराने 'बिग बॉस 17'मध्ये प्रवेश केला आहे.
मनारा चोप्राने 'बिग बॉस 17'च्या घरात प्रवेश करताच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. घरात एन्ट्री करताच तिने कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्यावर बाबत केलं आहे. बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच मनारा सलमानसोबत 'लाल दुप्पटा' गाण्यावर थिरकली. दरम्यान तिने तिच्या व्हायरल झालेल्या जुन्या व्हिडीओवर भाष्य केलं.
दिग्दर्शकाने किस केल्याबद्दल मनारा म्हणाली...
मनाराला एका कार्यक्रमादरम्यान दिग्दर्शकाने किस केलं होतं. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. 'बिग बॉस'च्या मंचावर या व्हिडीओवर स्पष्टीकरण देत अभिनेत्री म्हणाली,"ते दिग्दर्शक माझ्यासाठी वडिलांसारखे होते. त्यांनीही मुलीप्रमाणे माझ्यावर प्रेम केलं. त्या नात्यात त्यांनी मला किस केलं होतं. बाकी काही नाही".
संबंधित बातम्या