Neil Bhatt : नील भट्ट (Neil Bhatt) हा लोकप्रिय अभिनेता आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत नीलची गणना होते. 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisi Kisikey Pyaar Meiin) या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला आहे. या मालिकेत त्याने विराट चव्हाणची भूमिका साकारली होती. नील भट्ट हा ऐश्वर्या शर्माचा (Aishwarya Sharma) पती असून त्याची 'बिग बॉस 17'मध्ये एन्ट्री झाली आहे.


कोण आहे नील भट्ट (Who is Neil Bhatt)


4 ऑगस्ट 1987 रोजी एका गुजराती कुटुंबात नील भट्टचा जन्म झाला. मुंबईत तो लहानाचा मोठा झाला आहे. त्याला एक धाकटी बहीण आहे. नीलने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. पण अभिनय आणि नृत्याची आवड असलेल्या तो मनोरंजनक्षेत्रात सक्रीय आहे. शिक्षण कायमच सोबत राहील असं त्याचं मत आहे. जिम्नॅस्टिक्स, कॅपोइराचंही त्याने प्रशिक्षण घेतलं आहे. नील भट्ट 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या सेटवर ऐश्वर्याच्या प्रेमात पडला. त्यानंतर लगेचच 30 नोव्हेंबर 2021 मध्ये उज्जैन येथे त्यांनी लग्न केलं.


रिअॅलिटी शोचा विजेता 'बिग बॉस 17'चाही विजेता होणार का? 


नील भट्टने 'काबूम' या डान्स रिअॅलिटी शोच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. बूगी वूगी या डान्स शोने त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली.  'अर्सलान' या मालिकेच्या माध्यमातून नीलने मालिकाप्रवासाला सुरुवात केली. पहिल्याच भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक झालं. 






नील भट्टने आपल्या करिअरमध्ये अनेक निवडक भूमिकांची निवड केली आहे. जिंदगी की हर रंग गुलाल, नच ले वे, रामायण, सावधान इंडिया, ये है आशिकी, दिया और बाती हम, जिंदगी जीत गई, लाल इश्क, शादी हो तो ऐसी, स्मार्ट जोडी अशा अनेक कलाकृतींच्या माध्यमातून नील भट्टने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. गुलाल, तेजी से आगे बढना, भंवर या सिनेमातही तो झळकला आहे.


ऐश्वर्या-नीलची लव्ह स्टोरी (Aishwarya Sharma Neil Bhatt Lovestory)


'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisi Kisikey Pyaar Meiin) या मालिकेच्या सेटवर ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांची ओळख झाली. मालिकेच्या सेटवरच त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2021 मध्ये ते लग्नबंधनात अडकले.'गुम है किसी के प्यार में' मालिकेत पत्रलेखा आणि नील यांचं नातं कॉम्पलिकेटेड दाखवण्यात आलं असलं तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्यांचं नातं बहरलं आहे. आता 'बिग बॉस 17'मध्ये दोघे काय दंगा घालणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : पहिल्यांदाच तीन घरांत रंगणार 'बिग बॉस 17'चा खेळ! आलिशान घर, थीम अन् स्पर्धक; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...