Bigg Boss 17 Contestants Fees : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या पर्वात मन्नारा चोप्रा (Mannara Chopra), मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui), ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma), नील भट्ट (Neil Bhatt), नावेद सोल (Naved Soul), अनुराग डोभाल (बाबू भैया) (Anurag Dobhal), सना रईस खान (Sana Raees khan) जिग्ना वोरा (Jigna Vora), अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), विकी जैन (Vicky Jain), सोनिया बंसल (Soniya Bansal), फिरोझा खान उर्फ खानजादी (Firoza Khan), सनी आर्या (Sunny Arya), रिंकू धवन (Rinku Dhawan), अरुण महाशेट्टी (Arun Mahashetty), अभिषेक कुमार (Abhishek Kumar), ईशा मालवीय (Isha Malviya) हे 17 स्पर्धक सहभागी झाले आहेत. 'बिग बॉस 17'मध्ये सहभागी होण्यासाठी या सर्व स्पर्धकांनी चांगलच मानधन घेतलं आहे.


अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) : 'बिग बॉस 17'च्या सर्वात चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांमध्ये अंकिता लोखंडेचा समावेश आहे. 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे 'बिग बॉस 17'मधली सर्वात महागडी स्पर्धक आहे. अंकिताने एका आठवड्यासाठी 12 लाख रुपये घेतले आहेत. 


मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) : विनोदवीर 'मुनव्वर फारुकी'ने 'बिग बॉस 17'साठी प्रती आठवडा सात-आठ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.


नील भट्ट (Neil Bhatt) : 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत झळकलेला अभिनेता नील भट्टने 'बिग बॉस 17'साठी 7-8 कोटी रुपये आकारले आहेत.


ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) : 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेतील पाखी अर्थात ऐश्वर्या शर्माने 'बिग बॉस 17'साठी एका आठवड्याचे 11 ते 12 लाख रुपये चार्ज केले आहेत. 


मनारा चोप्रा (Mannara Chopra) : अभिनेत्री मनारा चोप्राने 'बिग बॉस 17'साठी 10 लाख रुपये चार्ज केले आहेत. 


अभिषेक कुमार (Abhishek Kumar) : अभिनेता अभिषेक कुमारने 'बिग बॉस 17'साठी प्रती आठवडा पाच लाख रुपये चार्ज केले आहेत. 


जिग्ना वोरा (Jigna Vora) : अभिनेत्री जिग्ना वोराने 'बिग बॉस 17'साठी प्रती आठवड्याचे 7.5 लाख रुपये आकारले आहेत. 


ईशा मालवीय (Isha Malviya) : अभिनेत्री ईशा मालवीयने 'बिग बॉस 17'च्या एका आठवड्याचे 7.5 लाख रुपये आकारले आहेत. 


अनुराग डोभाल (बाबू भैया) (Anurag Dobhal) : अनुरागने 'बिग बॉस 17'च्या एका आठवड्याचं 7.5 लाख रुपये मानधन घेतलं आहे.


रिंकू धवन (Rinku Dhawan) : अभिनेत्री रिंकू धवनने 'बिग बॉस 17'च्या एका आठवड्यासाठी चार लाख रुपये आकारले आहेत. 


सना रईस खान (Sana Raees khan) : वकील सना रईस खानने 'बिग बॉस 17'साठी सहा लाख रुपये आकारले आहेत. 


फिरोझा खान उर्फ खानजादी (Firoza Khan) : 'बिग बॉस 17'साठी रॅपर फिरोझा खानने सर्वात कमी म्हणजेच एका आठवड्यासाठी फक्त तीन लाख रुपयांचं मानधन घेतलं आहे.


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : पहिल्यांदाच तीन घरांत रंगणार 'बिग बॉस 17'चा खेळ! आलिशान घर, थीम अन् स्पर्धक; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...