Tharla Tar Mag Latest Update : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील नव-नवीन ट्विस्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत हळूहळू अर्जुनला सायलीवरच्या प्रेमाची जाणीव होत आहे. त्यामुळे आता सायली-अर्जुनचं नातं कोणतं वळण घेणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


'ठरलं तर मग' या मालिकेत सध्या नवरात्री विशेष भाग पार पडत आहे. सायली रुग्णालयातून घरी आल्याने सुभेदारांकडे आनंददायी वातावरण आहे. मालिकेत आता अर्जुनला सायलीवरच्या प्रेमाची जाणीव होत आहे. तर दुसरीकडे अर्जुनने आपला रुग्णालयातील खर्च केल्यामुळे सायलीच्या मनात परकेपणाची भावना निर्माण झाली आहे.






सायली-अर्जुनमध्ये फुलणार प्रेमाचं नातं?


सायलीवर गुंडांनी हल्ला केल्यानंतर अर्जुन तिला एका चांगल्या रुग्णालयात दाखल करतो आणि तिथला सर्व खर्चही करतो. सायलीला मात्र परकेपणा वाटत असल्याने ती अर्जुनचे आभार मानते. सायलीने आभार मानल्याने अर्जुन तिच्यावर नाराज होतो. त्यानंतर अर्जुन सायलीला पत्र लिहिलो की,"तुम्हाला जर पैसे द्यायचे असतील तर मलाही तुम्ही माझ्या कुटुंबासाठी जेवढं करता आहात त्याची परतफेड करावी लागेल". त्यानंतर अर्जुनचं पत्र वाचून सायली भावूक होते. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात सायली अर्जुनमध्ये प्रेमाचं नातं फुलणार का? हे जाणून घेण्याची मालिकाप्रेमींना उत्सुकता आहे.


सायली-अर्जुनच्या नात्याची अनोखी कहाणी 'ठरलं तर मग'


'ठरलं तर मग' ही रोमॅंटिक मालिका आहे. या मालिकेत जुईने सायलीची तर अमितने अर्जुनची भूमिका साकारली आहे. सचिन गोखले या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. ठरलं तर मग ही एक प्रेम कथा आहे. प्रेम वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या परिस्थितीत घडतं हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे.


जुई गडकरी आणि अमित भानुशालीसोबत ज्योती चांदेकर, सागर तळाशीकर, माधव अभ्यंकर, मीरा जगन्नाथ, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, ज्ञानेश वाडेकर, नारायण जाधव अशी दिग्गज कलाकारांची फौज 'ठरलं तर मग' या मालिकेत आहे.


संबंधित बातम्या


Tharla Tar Mag : प्रेक्षकांची पसंती 'ठरलं तर मग'ला; जाणून घ्या महाराष्ट्राच्या फेव्हरेट मालिकेबद्दल...