Bigg Boss 17 Ankita Lokhande Pregnancy : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे.'बिग बॉस'च्या घरात कधीही न घडलेल्या गोष्टी यंदाच्या पर्वात घडत आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर नावेद सोल (Navid Sole) या स्पर्धकाने यासंदर्भात खुलासा केला आहे.
अंकिता लोखंडेच्या प्रेग्नंसीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. रिंकू आणि जिग्ना वोरासोबत बोलताना अभिनेत्रीने तिला आंबट पदार्थ खाण्याची इच्छा होत असल्याचं तिने सांगितलं होतं. त्यानंतर विकी जैनसोबत (Vicky Jain) बोलतानाचा तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती पाळी न आल्याचं तसेच प्रेग्नंसी टेस्ट झाल्याचं आपल्या पतीला सांगताना दिसून आली. त्यानंतर 'बिग बॉस 17'च्या एकाही एपिसोडमध्ये अंकिताच्या प्रेग्नंसीबद्दल भाष्य करण्यात आलेलं नाही. पण आता नुकताच 'बिग बॉस 17'च्या घरातून बाहेर पडलेल्या नावेद सोलने अंकिताच्या प्रेग्नंसीबद्दल भाष्य केलं आहे.
अंकिताच्या प्रेग्नंसीबद्दल नाविदचा खुलासा
'बिग बॉस 17'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत नाविद सोल म्हणाला,"आतापर्यंतच चित्र पाहता सर्व सकारात्मकच आहे. अंकितादेखील या गोष्टीसाठी खूप उत्सुक आहे. अंकिताने मला तिच्या होणाऱ्या बाळाचं नाव ठेवण्यास सांगितलं आहे. अंकिता आणि मी हिंदी आणि वेस्टर्न कॉम्बिनेशन असलेलं बाळाचं नाव ठेवण्याचा विचार करत आहोत".
अंकिताच्या बाळाचं नाव मी ठरवलं आहे : नावेद सोल
नावेद पुढे म्हणाली,"अंकिताच्या प्रेग्नंसीच्या चर्चांमुळे सर्वत्र पॉझिटिव्ह वातावरण आहे. मीदेखील यासाठी खूप उत्सुक आहे. अंकिताच्या बाळाचं नाव मी ठेवणार आहे. तिनेच मला बाळाचं नाव ठेवण्यास सांगितलं आहे. बाळाचं नाव ठरवलंदेखील आहे. योग्य वेळ आली की मी सर्वांसोबत शेअर करेल".
'बिग बॉस'च्या घरात अंकिताची प्रेग्नंसी टेस्ट
'बिग बॉस 17'च्या चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांमध्ये अंकिता लोखंडेचा समावेश होतो. कधी प्रेग्नंसी तर कधी सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेत्री चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अंकिताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती पती विकाला सांगत होती की,"सध्या मी खूप कन्फ्यूज आहे. माझी प्रेग्नंसी टेस्ट देखील झाली आहे. प्रेग्नंसी टेस्टसह ब्लड टेस्ट आणि यूरिन प्रेग्नंसी टेस्टदेखील झाली आहे. मला पाळीदेखील आलेली नाही. मी खरचं प्रेग्नंट आहे की नाही हे मला माहिती नाही. पण आता मला घरी जायचं आहे".
संबंधित बातम्या