Bigg Boss 16 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा बिग बॉस  (Bigg Boss) या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमाच्या अपकमिंग सिझनची म्हणजेच 16 व्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या सिझनचे सूत्रसंचालन देखील सलमानच करणार आहे. बिग बॉस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी सलमान किती मानधन घेतो? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात सलमानच्या मानधनाबाबत...


सलमान किती घेतो मानधन? 
बिग बॉस-15 चे सूत्रसंचालन करण्यसाठी सलमाननं जवळपास  350 कोटींचे मानधन घेतले होते. आता सलमाननं त्याची फी वाढवली आहे, अशी चर्चा आहे. क्रिटिक्स आणि ओव्हरसीज सेन्सर बोर्डाचे सदस्य असणाऱ्या उमैर संधू यांनी असा दावा केला आहे की, सलमाननं बिग बॉसच्या 16 व्या सिझनसाठी 800 कोटी मानधन घेतलं. एका रिपोर्टनुसार, सलमाननं या सिझनसाठी 1050 कोटींची डिमांड केली होती, पण 800 कोटींमध्ये त्याच्यासोबत हे डील करण्यात आलं. 


बिग बॉस-16 'हे' सेलिब्रिटी होऊ शकतात सहभागी


ऑगस्टमध्ये सलमान हा बिग बॉसच्या 16 व्या सिझनच्या प्रोमोचं शूटिंग करु शकतो. अभिनेता अर्जुन बिजलानीला या सिझनची ऑफिर देण्यात आली होती. पण अर्जुननं या सिझनध्ये काम करण्यास नकार दिला. ‘खतरों के खिलाडी 12' मधील काही स्पर्धक हे या शोमध्ये सहभागी होणार आहेत, अशी देखील चर्चा आहे. 


बिग बॉस-16 ची 'ही' असेल थीम
बिग बॉसच्या 15 व्या सिझनची जंगल थीम होती. तर बिग बॉसच्या-16 व्या सिझनची थीम ही अॅक्वा असणार आहे. बिग बॉस-16 या सिझनच्या सेटचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.  


हेही वाचा: