Shiv Thakare Amravati:  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस-16' (Bigg Boss 16) चा काही दिवसांपूर्वी ग्रँड फिनाले पार पडला. या कार्यक्रमाचा एमसी स्टॅन (MC Stan) हा विजेता ठरला. तर शिव ठाकरे (Shiv Thakarey) हा बिग बॉस-16 चा रनरअप ठरला. शिव ठाकरे हा बिग बॉस-16 चा विजेता ठरावा, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. पण शिवच्या मंडली ग्रुपचा एमसी स्टॅन जिंकल्यानं त्याचे चाहते नाराज झाले नाहीत. आता शिव त्याच्या घरी म्हणजेच अमरावती (Amravati) येथे पोहोचला. अमरावतीकरांनी शिवचं जंगी स्वागत केलं आहे. 


अमरावतीकरांनी शिव ठाकरेचं फटाके फोडून आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं. शिवचे सर्व चाहते त्याला भेटण्यासाठी आले होते. अनेकांनी शिवच्या नावाचा गजर केला. शिवनं त्याच्या चाहत्यांचे आभार देखील मानले. सध्या अमरावतीमधील शिवचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवच्या अनेक फॅन पेजनं हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 






चाहत्यांनी केली गर्दी 
शिव ठाकरेच्या अमरावतीमधील चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. गाडीच्या रुफवर येऊन चाहत्यांना आपली झलक दाखवली. शिवसोबत सेल्फी काढण्यासाठी देखील अनेक चाहते आले होते. 






एमसी स्टॅन, शिव ठाकरे (Shiv Thakarey) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस 16 चे टॉप-3 स्पर्धक होते. यामधील एमसी स्टॅन हा विजेता ठरला. एमसी स्टॅनला बिग बॉस 16 रिलीज झाल्यानंतर 31 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. तसेच एमसी स्टॅनला बिग बॉसची ट्रॉफी सलमान खानच्या हस्ते मिळाली. या ट्रॉफीवर बिग बॉसचा लोगो आहे. 


शिव ठाकरे 'बिग बॉस' आधी एमटीव्हीच्या 'रोडीज' या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. शिव हा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता आहे. या कार्यक्रमामुळे शिवला विशेष लोकप्रियता मिळाली. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Bigg Boss 16: आलिशान कार, ट्रॉफी आणि लाखोंचं बक्षीस; 'बिग बॉस 16' चा विजेता एमसी स्टॅनला काय काय मिळालं?