MC Stan: बिग बॉस-16 (Bigg Boss 16) चा ग्रँड फिनाले काल (12 फेब्रुवारी) रॅपर एमसी स्टॅन  (MC Stan)  हा बिग बॉस-16 चा विजेता ठरला आहे.  तर शिव ठाकरे हा बिग बॉस-16 चा पहिला रनरअप ठरला आहे.  एमसी स्टॅन, शिव ठाकरे  (Shiv Thakarey)  आणि  प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस 16 चे टॉप-3 स्पर्धक होते. त्यानंतर प्रियांका ही बिग बॉस 16 मधून आऊट झाली. शिव ठाकरे  (Shiv Thakarey) आणि एमसी स्टॅन हे बिग बॉस -16 मधील टॉप-2 स्पर्धक होते. त्यांच्यामधील एमसी स्टॅन हा विजेता ठरला. एमसी स्टॅनला बिग बॉसच्या ट्रॉफी बरोबरच लाखोंचे बक्षीस मिळाले आहे. एमसी स्टॅनला काय काय मिळाले? असा प्रश्न काही प्रेक्षकांना पडला असेल. जाणून घेऊयात एमसी स्टॅनला मिळालेल्या बक्षिसाबद्दल...


एमसी स्टॅनला काय काय मिळालं?


बिग बॉस 16 चा विजेता ठरलेल्या एमसी स्टॅनला 31 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. तसेच एमसी स्टॅनला बिग बॉसची ट्रॉफी सलमान खानच्या हस्ते मिळाली. या ट्रॉफीवर बिग बॉसचा लोगो आहे. तसेच या ट्रॉफीचे डिझाइन हे युनिकॉर्नची आहे. एमसी स्टॅनला एक आलिशान गाडी देखील बक्षीस म्हणून देण्यात आली.


एमसी स्टॅनची पोस्ट


बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर एसमी स्टॅननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये एमसी स्टॅननं काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये त्याच्या हातात ट्रॉफी दिसत आहे. तसेच फोटोमध्ये एमसी स्टॅनसोबत सलमान खान देखील दिसत आहे. या पोस्टला एमसी स्टॅननं कॅप्शन दिलं, 'आईचं स्वप्न पूर्ण केलं आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा माझ्या यशात मोलाचा वाटा आहे. स्टॅन तुमचाच आहे". 






एमसी स्टॅन हा पुण्याचा आहे. त्याचं खरं नाव अल्ताफ शेख असं आहे. वाता या गाण्यामुळे स्टॅनला विशेष लोकप्रियता मिळाली. एमसी स्टॅन हा त्याच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे देखील चर्चेत असतो. त्याचा '80 हजार के जूते' हा सोशल मीडियावर डायलॉग खूप व्हायरल झाला होता. एमसी स्टॅनचे शूज, टी-शर्ट आणि बेल्ट या वस्तू अनेकांचे लक्ष वेधतात.


संबंधित बातम्या


MC Stan : पुणेकर एमसी स्टॅन ठरला 'बिग बॉस 16'चा विजेता, विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर म्हणाला,"आईचं स्वप्न पूर्ण केलं"