Bigg Boss 16 Contestant: 'बिग बॉस'चा सीझन 16 (Bigg Boss 16) लवकरच सुरू होणार आहे. सलमान खानचा हा लोकप्रिय रिअॅलिटी शो 1 ऑक्टोबरपासून प्रसारित होणार आहे. चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर, चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी निर्माते देखील शोचे छोटे-छोटे प्रोमो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या सगळ्या दरम्यान, यावेळी 'बिग बॉस'चे निर्माते वेगळ्या पद्धतीने शोच्या स्पर्धकांशी संबंधित माहिती देत ​​आहेत. शोच्या कोणत्याही स्पर्धकाचे नाव अद्याप अधिकृतरित्या समोर आलेले नाही. मात्र, सध्या टीव्हीच्या एका प्रसिद्ध सुनेचे नाव चर्चेत आले आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, साजिद खान, सुंबुल तौकीर, शिव ठाकरे यांच्यानंतर निम्रत कौर अहलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) देखील ‘बिग बॉस 16’च्या घरात प्रवेश करणार असल्याचे कळते आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.



'छोटी सरदारनी'च्या नावाची चर्चा!


'छोटी सरदारनी' या मालिकेमध्ये ‘मेहेर’ची भूमिका साकारून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री निम्रत कौर अहलुवालिया आता ‘बिग बॉस 16’च्या घराचा भाग बनणार आहे. या शोसाठी अभिनेत्रीची निवड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. निर्मात्यांनी तिच्याशी संपर्क साधला असून, तिने देखील होकार दिला असल्याचा दावा केला जात आहे. मालिकेतून तिने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता ती बिग बॉसमध्ये आपला जलवा दाखवणार आहे.


कोण आहे निम्रत कौर?


अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त निम्रत कौर अहलुवालिया वकील देखील आहे. निम्रत कौर अहलुवालिया अभिनेत्री होण्यापूर्वी मॉडेल देखील होती. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 2018 मध्ये निम्रतने ‘फेमिना मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेतही भाग घेतला होता. त्यात निम्रतचा टॉप-12मध्ये समावेश होता. 'छोटी सरदारनी' व्यतिरिक्त निम्रत कौर अहलुवालिया 'नाटी पिंकी की लव्ह स्टोरी'मध्येही दिसली आहे. याशिवाय ती इतर काही शोमध्ये पाहुणी कलाकार म्हणूनही झळकली होती. निम्रत कौर काही म्युझिक व्हिडीओ आणि 'खतरा खतरा'सारख्या रिअॅलिटी शोचा भागही बनली आहे. निम्रत कौर ही दिल्लीची असून, तिचे शालेय शिक्षण दिल्लीतून पूर्ण झाले आहे. तर, मोहाली येथील महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली आहे.


‘बिग बॉस 16’च्या घरात जाण्यासाठी ‘ही’ नावे चर्चेत!


दरवर्षीप्रमाणे, यंदाही प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यात आली आहे. ‘बिग बॉस’च्या नवीन सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रसिद्ध सेलिब्रिटी स्पर्धकांची संपूर्ण यादी अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनोरंजन विश्वातील अनेक चर्चित चेहऱ्यांना या शोसाठी संपर्क साधण्यात आला आहे आणि यातील काही चेहरे आगामी ‘बिग बॉस 16’ मध्ये सहभागी होऊ शकतात. ‘बिग बॉस 16’च्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विवियन डिसेना, जन्नत जुबेर, मुनव्वर फारुकी, शिवांगी जोशी, शिवीन नारंग, दिव्यांका त्रिपाठी, कनिका मान, अर्जुन बिजलानी यांची नावे चर्चेत आहेत.


संबंधित बातम्या


Bigg Boss 16 : बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; भाईजानच्या बिग बॉसचं नवं पर्व लवकरच होणार सुरू


Salman Khan : सलमान खानच्या अडचणीत वाढ; गँगस्टरच्या निशाण्यावर असल्याचा शूटरचा खुलासा