Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त लोकप्रिय कार्यक्रम अशी बिग बॉस (Bigg Boss) या कार्यक्रमाची ओळख आहे. या कार्यक्रमाचं प्रत्येक पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतं. त्यामुळेच प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत असतात. लवकरच सलमान खानच्या (Salman Khan) बिग बॉसचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'झलक दिखला जा'च्या प्रीमियरला प्रोमो होणार आऊट
बिग बॉसच्या यंदाच्या पर्वाची थीम अॅक्वा असणार आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या सेटवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सलमान खानने 'बिग बॉस 16'च्या पहिल्या प्रोमोचं शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यामुळे चाहत्यांना आता प्रोमोची उत्सुकता आहे. रिपोर्टनुसार, 'झलक दिखला जा' या कार्यक्रमाच्या प्रीमियर दरम्यान 'बिग बॉस 16'चा प्रोमो आऊट करण्यात येणार आहे.
'बिग बॉस 15' टीआरपीच्या शर्यतीत मागे पडला होता. हा कार्यक्रम प्रेक्षकांवर आपली जादू दाखवण्यात कुठेतरी कमी पडला. त्यामुळे 'बिग बॉस 16'ची चाहते प्रतीक्षा करत होते. पण यंदाचं पर्व खूपच खास असणार आहे. येणारं पर्व प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करणार आहे. तर बिग बॉस मराठीदेखील लवकरच सुरू होणार आहे.
3 सप्टेंबरला 'झलक दिखला जा'चा होणार प्रीमियर
'झलक दिखला जा' या कार्यक्रमाचा प्रीमियर 3 सप्टेंबरला कलर्स वाहिनीवर होणार आहे. या कार्यक्रमाच्या परिक्षणाची धुरा करण जौहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही सांभाळणार आहेत. तर शिल्पा शिंदे, रुबीना दिलैक, निया शर्मा, फैजल शेख, गश्मीर महाजनी, धीरज धूपर, पारस कलनावत, गुंजन, नीती टेलर, अमृता खानविलकर हे या कार्यक्रमातील स्पर्धक आहेत.
तेजस्वी प्रकाश ठरली होती 'बिग बॉस 15'ची विजेती
'बिग बॉस 15' ऑक्टोबरमध्ये सुरू झाला होता. 2 ऑक्टोबर 2021 रोजी या कार्यक्रमाचा प्रीमियर झाला होता. तर 30 जानेवारी 2022 रोजी या कार्यक्रमाचा महाअंतिमसोहळा रंगला होता. मराठमोळी तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) 'बिग बॉस 15'ची विजेती ठरली होती.
संबंधित बातम्या