Karan Kundrra Parents Reaction : छोट्या पडद्यावरील बिग बॉस या कार्यक्रमाला सध्या प्रेक्षकांची पसंत मिळत आहे. बिग बॉसचा सध्या 15 वा (Bigg Boss 15) सिझन सुरू आहे. या सिझनमधील करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. करण आणि तेजस्वीच्या नात्याबद्दल नुकतीच करणच्या आई- वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये करणच्या आईने म्हणजे सुनिता कुंद्रा यांनी सांगितले की, 'बिग बॉसमध्ये जेव्हा सलमान करणला तेजस्वी आणि त्याच्या नात्याबद्दल रागवत होता तेव्हा मला रात्रभर झोप येत नव्हती कारण त्याला टॉक्सिक बॉयफ्रेंड असं म्हणले जात होते.'
करणच्या वडिलांनी सांगितले, 'जे आम्ही शोमध्ये पाहतो आणि जे ऐकतोय त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवत आहे. अनेक निर्णय अजून पेंडिग आहेत. जेव्हा आम्ही करणला भेटू तेव्हा आम्ही काही गोष्टींवर चर्चा करणार आहोत. आम्ही दोघांच्या सोबत आहोत. काही गोष्टी त्या दोघांसोबत आम्ही बोलणार आहोत.'
लवकरच बिग बॉस 15 चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे सध्या शो महत्वाच्या वळणावर आहे. बिग बॉस-15 चा विजेता स्पर्धक कोण ठरेल? या गोष्टीची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या
Shahrukh khan : किंग इज बॅक! आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुख खानची पहिली पोस्ट
Naagin 6 Promo : एकता कपूरच्या 'Naagin 6' चा प्रोमो रिलीज, मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha