Kamya Punjabi And Develeena Bhattacharjee: बिग बॉस 15 (Bigg Boss 15) मध्ये दिवाळीनिमित्त घरातील सदस्यांना भेटायला 'काम्या पंजाबी' (Kamya Punjabi) आणि 'देवोलिना भट्टाचार्जी' (Devoleena Bhattacharjee) गेले होते. या पाहुण्यांनी घरातील सदस्यांना दिवाळीचा चांगलाच धमाका दिलेला आहे. त्यांनी घरातील सदस्यांची बोलतीच बंद केली आहे. काम्या पंजाबीने कठोर शब्दांत ईशान सहगल (Ieshan Sehgal), राजीव अदातिया आणि विशाल कोटियनला चांगलेच सुनावले आहे. 


काव्याने घेतली घरातील स्पर्धकांची शाळा
छोट्या पडद्यावरची काव्या बिग बॉसच्या आधीच्या पर्वात सहभागी झाली होती. बिग बॉसच्या अनेक पर्वात काव्याने प्रमुख पाहुणी म्हणून हजेरी लावली आहे. या पर्वात काव्याने घरातील स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली आहे. घरातील स्पर्धक फक्त भांडताना आणि रडतानाच दिसून येत आहेत, असे काव्या म्हणाली. प्रेक्षकांना त्यामुळे बिग बॉस बघताना मजा येत नाही. त्यानंतर काव्याने ईशान आणि तेजस्वीला चांगलेच सुनावले. काव्या शमिताला म्हणाली,"तुझं लक्ष फक्त कॅमेरामध्येच का असतं. त्यावरुन काव्या शमिताला चांगलीच ओरडली".





 


Mission Majnu Release Date: 'मिशन मजनू' 'या' दिवशी होणार प्रदर्शित, Siddharth malhotra चा हटके लूक


देवोलिनाने घरातील स्पर्धकांना सुनावले
देवोलिनाने शमिता शेट्टी आणि अफसाना खान यांच्यातील वादावर भाष्य केले. विशाल कोटियनलादेखील देवोलिना ओरडली. त्यामुळे विशाल नाराज झालेला दिसून आला. सलमान खानच्या बिग बॉसने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या मनात चांगले स्थान निर्माण केले आहे. या पर्वातील सदस्य घरात आल्यापासूनच भांडणात दिसत आहेत. नॉमिनेशन टास्क दरम्यान घरातील सदस्य जास्त भांडताना दिसतात. 


सिंबा नागपालला केले सोशल मीडियावर ट्रोल 
बिग बॉस 15 च्या पर्वातील सदस्यांचे खरे चेहरे आता प्रेक्षकांना पहायला मिळत आहेत. या पर्वाचा आता पाचवा आठवडा सुरू झाला आहे. या चार आठवड्यांत घरातील सदस्य थोडे शांत दिसून येत होते. पण आता त्यांच्या रागाचा पारा हळूहळू वाढत चालला आहे. सिंबा नागपाल तर बिग बॉसच्या घरातील सर्वात शांत सदस्य होता. पण आता त्याने देखील रौद्र रुप धारण केले आहे. सिंबा नागपालला सोशल मीडियावरदेखील ट्रोल करण्यात येत आहे.


Shahrukh Khan Birthday: वाढदिवशी 'शाहरुख' मुंबईबाहेर, 'मन्नत'वर चाहत्यांची तुडुंब गर्दी