Shahrukh Khan B'day: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) चा आज वाढदिवस आहे. किंग खानने आज 56 व्या वर्षात पदार्पण केले आहे. शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते सकाळपासून मन्नतच्या बाहेर उभे आहेत. पण आज शाहरुख चाहत्यांना भेटू शकत नसल्याचे दिसत आहे. 


शाहरुख खान (Shahrukh Khan) आज वाढदिवसाला मुंबईच्या बाहेर आहे. बंगल्यातील सुरक्षारक्षक शाहरुखच्या चाहत्यांना सांगत आहेत,"शाहरुख घरी नसल्याने तुम्ही घरी जा". शाहरुख त्याचा वाढदिवस अलिबागमध्ये कुटुंबियांसोबत साजरा करतो आहे. त्यामुळेच पोलिसदेखील चाहत्यांना मन्नतबाहेर थांबवत नाही आहेत. शाहरुखच्या मॅनेजरने शाहरुख घरी नसल्याची माहिती पोलिसांना दिलेली आहे. दरवर्षी मन्नतबाहेर चाहते शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी मन्नतबाहेर येत असतात. शाहरुखदेखील त्याच्या बालकणीत उभा राहून चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत असतो. 


Squad Trailer: रिनजिंक डेंजोंगपाचा पहिला सिनेमा 'स्क्वाड'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला


शाहरुखच्या वाढदिवसाला मन्नत एखाद्या नववधूसारखा सजवला आहे. शाहरुख मागील काही दिवसांपासून आर्यन खानमुळे (Aryan Khan) मुळे चिंतेत होता. क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन 29 दिवस तुरुंगात अटकेत होता. आता त्याची सुटका झाली आहे. आर्यन खानला 28 ऑक्टोबरला जामीन मिळाला होता. त्यानंतर 31 ऑक्टोबरला आर्यन आर्थर रोड तुरुंगातून मन्नतवर पोहोचला होता. त्यामुळे हा वाढदिवस शाहरुखसाठी नक्कीच खास असणार आहे.





  


 


शाहरुख खान त्याचा वाढदिवस अलिबागच्या फार्महाऊसवर साजरा करतो आहे. दरवर्षी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते 'मन्नत' या बंगल्याबाहेर गर्दी करतात. किंग खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास प्रतीक्षा करतात. यावर्षीही चाहत्यांनी गर्दी केली. मात्र ही गर्दी तिथून पोलिसांनी हटवली. वांद्रे झोनचे पोलीस उपायुक्त आज सकाळी मन्नतबाहेर तैनात होते. त्यांनी मीडिया कर्मचारी आणि चाहत्यांना शाहरूखच्या घराबाहेर असण्याऱ्या काळ्या गेटवर गर्दी करण्यापासून रोखलं. पोलिसांनी सांगितलं की, शाहरूखने मॅनेजर पूजा ददलानीद्वारे माहिती दिली आहे की, तो त्याच्या कुटुंबीयांसह अलिबागच्या फार्महाऊसवर वाढदिवस साजरा करणार आहे.


Amazon Prime-Sajid Nadiadwala Deal : अ‍ॅमेझॉनसोबत साजिद नाडियाडवालाची 250 कोटीची डील; 'हे' पाच चित्रपट होणार प्रदर्शित