मुंबई : बिग बॉस 14 मध्ये आता केवळ पाच कंटेस्टंट्स रुबीना दिलायक, राहुल वैद्य, अली गोनी, निक्की तांबोळी आणि राखी सावंत राहिले आहेत. यापैकी सर्वाधिक फी घेणारा कंटेस्टंट्स अली गोनी आहे. तो प्रति आठवडा प्रत्येकी 14 लाख रुपये घेत आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रुबीना दिलायक आहे. जी प्रती आठवडा पाच लाख रुपये घेते. राहुल वैद्य प्रती आठवडा 1 लाख रुपये, निक्की तांबोळी प्रती आठवडा 1.2 लाख रुपये आणि राखी सावंत प्रती आठवडा अडीच लाख रुपये घेते.


सर्वाधिक फी घेणाऱ्या लोकांमध्ये अली गोनी सर्वात पुढे आहे. परंतु, या स्पर्धकांमध्ये सर्वात श्रीमंत एकच स्पर्धक आहे. ती म्हणजे, राखी सावंत. तिने शोमध्ये चॅलेंजर म्हणून एन्ट्री घेतली होती. तेव्हापासून तिने प्रेक्षकांचं खूप मनोरंज केलं आहे. राख घरातील सर्वात श्रीमंत स्पर्धकांपैकी एक आहे. तिच्याकडे 37 कोटी रुपयांची संपत्ती आहे.


राखी सावंत आहे सर्वातल श्रीमंत स्पर्धक


न्यू क्रेबने दिलेल्या माहितीनुसार, राखी सावंतकडे 37 कोटी रुपयांची संपत्ती आहे. राखीकडे मुंबईत दोन प्लॅट आणि एक बंगला आहे. ज्याची किंमत 11 कोटी रुपये आहे. राखीकडे 21.6 लाख रुपयांची एक फोर्ड एंडीवर कार आहे. राखीची सर्वाधिक कमाई स्टेज परफॉर्मेंसमधून होते. याव्यतिरिक्त ती भोजपुरी चित्रपटांमध्ये आयटम नंबरही करते. तसेच तिने अनेक बिजनेसमध्ये इन्वेस्टही केलं आहे.


पाहा राखीचा व्हिडीओ :





रुबीना आणि अली गोनीचं नेट वर्थ


अली गोनीबाबत बोलायचं झालं तर, त्याचा नेट वर्थ 15 कोटी रुपये आहे. त्याने स्प्लिट्सविला 5 मधून डेब्यू केला होता. त्यानंतर अनेक टीव्ही सीरियल्समध्ये कामही केलं आहे. तसेच, रुबीना दिलायकही नेट वर्थ 15 कोटी रुपयांहून अधिक आहे. तिने छोटी बहू आणि शक्ती यांसारख्या सीरियल्समधून डेब्यू केला होता. त्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती.


महत्त्वाच्या बातम्या :