Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये (Bigg Boss Marathi New Season) चौथ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. रितेश देशमुखने स्पर्धकांच्या घरातील वागण्यावर त्यांची कानउघडणी केलीच पण त्यांची शिक्षा देखील सुनावली. बिग बॉसच्या घरात दिवसागणिक प्रत्येकाची समीकरणं बदलत असतात. तसेच जर एखाद्याला घराबाहेर काढण्याची पॉवर दिली तर ते सदस्य कुणाला घराबाहेर काढतील याविषयी देखील आता खुलासा झाला आहे.
भाऊच्या धक्क्यावर इर्मजन्सी सिनेमाच्या निमित्ताने कंगना रणौत आणि श्रेयस तळपदे यांनी हजेरी लावली. त्यावेळी एक टास्क घरातल्या स्पर्धकांना देण्यात आला होता. घरातल्यांना एका पॉवर खुर्चीत बसवण्यात आलं आणि त्यामध्ये दोन स्पर्धकांची नावं देण्यात आली. यामध्ये एका स्पर्धकाचा फोटो लावून त्याला लाथ मारुन त्या फुटबॉलला घराबाहेर काढायचं असतं.
वैभवने लाथ मारुन निक्कीला बाहेर काढलं
वैभवला घन:श्याम आणि निक्की असे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यावेळी वैभवने निक्कीचा फोटो लावून फुटबॉलला लाथ मारुन तिला घराबाहेर काढलं. त्यावर स्पष्टीकरण देताना वैभवने म्हटल की, निक्कीला सगळ्याच गोष्टी तिच्याभोवती फिरतायत असं वाटतंय. आम्हीही तिच्याचभोवती फिरतोय असंही तिला वाटतंय. पण तसं काही नाहीये. मला तिच्या काही गोष्टी नाही पटत. पण अरबाजमुळे तिला ते सगळं सांगणं जड जातंय. घन:श्यामचा गेम वीक आहे पण मला वाटतंय तो राहिल म्हणून. निक्की चांगली आहे, पण तिच्या काही गोष्टी खटकतात.
त्यावर रितेश निक्कीला म्हणतो की, ज्या व्यक्तीला तुम्ही वाचवलत त्यानेच तुम्हाला घराबाहेर काढलं. तेव्हा निक्कीने रितेशला उत्तर दिलं की, मला सर या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी मला काहीतरी वाटतं तर वाटतं.
ग्रुप A मध्ये पडली उभी फूट
निक्कीला तिच्या ग्रुपमधील सदस्य तिच्याबद्दल काय म्हणतात हे रितेश भाऊ दाखवतो. त्यानंतर बाहेर येऊन निक्की म्हणते,"ग्रुप A साठी मी टाळ्या वाजवत आहे. त्यांच्यात दम तर नाहीच आहे. हलके लोक आहेत हे.. ग्रुप Aला मी ट्रॉफी उचलू देणार नाही, हा माझा वादा आहे".