Bharti Singh Pregnancy : लाफ्टर क्विन भारती सिंग (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) आई-बाबा होणार आहेत. भारतीने शुक्रवारी इंस्टाग्रामवर भन्नाट व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. भारती आणि हर्षने त्यांच्या नवीन यूट्यूब चॅनेल 'लॉल लाईफ ऑफ लिंबाचियाज' (LOL Life of Limbachiyaas) वर पोस्ट केलेल्या 'हम माँ बनने वाले है' (Hum Maa Banane Wale Hai) या व्हिडिओमध्ये आई-बाबा होणार असल्याचं जाहीर केले आहे.
भारती सिंगने हर्ष लिंबाचियासोबत 3 डिसेंबर 2017 मध्ये गोव्यात पंजाबी पद्धतीनं धूमधडाक्यात लग्न केलं. यामध्ये हळदी समारंभ, मेहेंदी समारंभ, पूल पार्टी आणि संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मोनालिसा आणि पती विक्रांत सिंग राजपूत यांसारखे अनेक सेलिब्रिटी, कॉमेडियन सुनील ग्रोव्हर, अभिनेत्री अनिता हसनंदानी, अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि तिचा पती सुयश राय आणि करण वाही या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.
भारती आणि हर्ष लिंबाचिया यांनी अनेक रिअॅलिटी शोमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांनी 'नच बलिए 8' मध्ये भाग घेतला आणि सध्या ते इंडियन गेम शो एकत्र होस्ट करत आहेत. भारतीने कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाईट्स बचाओ आणि झलक दिखला जा सारख्या टीव्ही शोमध्ये झळकली होती.
इतर बातम्या :
- Virushka 4th Wedding Anniversary : विराट-अनुष्काच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण
- मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांच्याकडून इस्लाम धर्माचा त्याग, सांगितलं 'हे' कारण
- अंतराळातही भारतीय पदार्थांचा डंका, अंतराळावीरांची चमचमित भारतीय अन्नाला पसंती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha