Virushka 4th Wedding Anniversary : अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) यांच्या लग्नाला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत. विरुष्काने (Virushka) चार वर्षापूर्वी आजच्याच दिवशी रेशीमगाठ बांधली होती. दोघांनी 11 डिसेंबर 2017 साली इटलीमध्ये मोजक्या मित्रपरिवारासमोर लग्न केले. त्यांच्या आयुष्यातील रोमांस आणि दोघांमधील संबंध चाहत्यांना आकर्षित करतात. अनुष्का आणि विराट नेहमी चाहत्यांना कपल गोल्स देत असते.


विराट आणि अनुष्काचं एकमेकांसाठीच प्रेम त्यांच्या पोस्टमधूनही झळकतं. अलिकडेच 5 नोव्हेंबरला विराटच्या वाढदिवस साजरा केला. यावेळेचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यामध्ये, दोन्ही लव्हबर्ड्स एकमेकांना मिठी मारतानाचा आनंद दिसत आहे. 
कोरोनामुळे सर्व जग ठप्प झालं असताना क्वारंटाईनमध्ये, जिथे प्रत्येकजण आपापल्या घरात कैद झाल्यामुळे घाबरुन गेले होते. तेथे विरुष्का मात्र क्वारंटाईनमध्ये कुटुंबियांसोबत वेळ घालवून मजा करताना दिसून आले. 
कोरोनाकाळात अनुष्काचा विराटचा हेअर कट करतानाचा इंस्टाग्रामवरील व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. 


अनुष्का आणि विराट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात यशस्वी आहेत. यांचं कपल 'पावर कपल' (Power Couple) पैकी एक आहे. दोघेही नेहमीच एकमेकांना समजून घेताना आणि पाठिंबा देताना दिसून येतात. दोघांचंही व्यवसायिक क्षेत्र वेगळं असलं तरी ते एकमेकांसाठी नक्की वेळ काढतात. विराट अनुष्काची मुलगी वामिका 11 महिन्यांची आहे. ते नेहमी वामिकासोबतचे फोटो पोस्ट करून चाहत्यांना अपडेट देत राहतात.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha