Celebrity Cricket League 2023 : सेलिब्रिटी क्रिकेट लीगला (Celebrity Cricket League 2023) सुरुवात झाली आहे. या क्रिकेट लीगमध्ये अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये मुंबई हिरोज, कर्नाटक बुलडोझर्स, चेन्नई रायनोज, तेलगू वॉरियर्स, केरळ स्ट्रायकर्स, बंगाल टायगर्स, पंजाब दे शेर आणि भोजपुरी दबंग या टीम्समध्ये एकूण 19 सामने खेळले जाणार आहेत, असं म्हटलं जात आहे. सुनील शेट्टी (Suniel Shetty), बॉबी देओल (Bobby Deol) यासारखे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते या क्रिकेट लीगमध्ये सहभाग घेणार आहेत. आता या क्रिकेट लीगच्या सामन्याला अभिनेत्री अविका गौरनं (Avika Gaur) हजेरी लावली. अविकानं क्रिकेटच्या मैदानावरील एक व्हिडीओ शेअर केला.
सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या मैदानातील व्हिडीओ अविकानं सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करत आहात? #CCL2023 मध्ये करमणूक आणि खिलाडूवृत्ती हे दोन्ही बघायला मिळते. यामध्ये आपल्या देशाच्या विविधतेतील एकता देखील दिसते.' अविका या व्हिडीओमध्ये डेनिम जॅकेट, पिंक शॉर्ट ड्रेस आणि व्हाईट शूज अशा लूकमध्ये दिसत आहे. अविकानं या व्हिडीओच्या माध्यमातून नेटकऱ्यांना सांगितलं की, ती सेलिब्रिटी क्रिकेट लीगमधील तेलगू वॉरियर्स या टीमला सपोर्ट करत आहे.
पाहा व्हिडीओ:
अविकाचे चित्रपट आणि मालिका
बालिका वधू, ससुराल सिमर का आणि लाडो वीरपुर की मर्दानी या मालिकांमध्ये अविकानं काम केलं आहे. बालिका वधू या मालिकेमुळे अविकाला विशेष पसंती मिळाली. या मालिकेत तिनं आनंदी ही भूमिका साकारली होती. अविकानं काही हिंदी आणि तेलूगू चित्रपटांमध्ये देखील काम केलं. 1920 हॉरर ऑफ द हार्ट या आगामी चित्रपटामधून अविका ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खतरों के खिलाडी या शोमधून देखील ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. अविका सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 1.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. तिचा पॉपकॉर्न हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Avika Gor : 'बालिका वधू' फेम अविका करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; विक्रम भट यांच्या चित्रपटात करणार काम