Avika Gor : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'बालिका वधू' (Balika Vadhu) मध्ये आनंदी ही भूमिका साकारणाऱ्या अविका गोरच्या (Avika Gor) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली.  छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करणारी अविका आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विक्रम भट (Vikram Bhatt) यांच्या चित्रपटामधून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. याबाबत विक्रम भट यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. 


विक्रम भट यांनी अविका गौर आणि महेश भट यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. त्यांनी या फोटोला कॅप्शन दिले, '1920 ने माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू केला आणि आता 1920 मध्ये सेट केलेल्या स्टोरीवर आधारित असणारा आणखी एक चित्रपट इंडस्ट्रीत प्रवेश करणार आहे. टॅलेंटेड अविका गौर आणि दिग्दर्शक कृष्णा भट्ट. 1920 हॉरर ऑफ द हार्ट हे माझ्या गुरू असलेल्या महेश भट्ट यांनी लिहिले आहे. याचा मी निर्माता झालो आहे.'






सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा 
अविकाला अनेक सेलिब्रिटींनी तिच्या या नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जाकिर खाननं कमेंट करून लिहिले, 'अविकाला शुभेच्छा.' बालिका वधू, ससुराल सिमर का आणि लाडो वीरपुर की मर्दानी या मालिकांमध्ये काम केलं आहे.


संबंधित बातम्या


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Sundar Amche Ghar : सासू-सुनेची जोडी, लावेल सगळ्यांना गोडी; गोष्टीची रंगत आता वाढणार


Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'अॅन अॅक्शन हिरो'