Sukh Mhanje Nakki Kay Asta: छोट्या पडद्यावरील सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेत जयदीप-गौरी यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. नुकताच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेच्या एका एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये जयदीप-गौरी यांचा रोमँटिक सीन दिसत आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर काही नेटकरी भडकले आहेत. या प्रोमोला कमेंट करुन अनेक युझर मालिकेला ट्रोल केलं आहे. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या एपिसोडच्या प्रोमोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'फॅमिलीसोबत बघता येईल असेच सीन दाखवा. थोडी हिंट दिली तरी सगळ्यांना समजतं पुढे काय होणार आहे. त्यामुळे एवढे रोमँटिक सीन्स दाखवू नका.'


'आमच्या कुटुंबियांसोबत आम्ही सीरिअल बघतो. प्लिज असले सीन्स नका दाखवू, मालिकेत लहान आर्टिस्ट आहेत, त्यामुळे आमची छोटी मुलं पण सीरिअल बघतात.' अशी कमेंट देखील एका युझरनं केली. 'मला वाटतं एवढं सगळं दाखवण्याची गरज नाही.', 'मराठी सीरिअलमध्ये काय फालतूपणा दाखवत आहेत.' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


पाहा प्रोमो:






'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. या मालिकेतील गौरी ही भूमिका गिरिजा प्रभू ही साकारते तर जयदीप ही भूमिका मंदार जाधव हा साकारतो. मालिकेच्या कथानक देखील प्रेक्षकांची मनं जिंकते.


काही दिवसांपूर्वी या मालिकेनं 700 एपिसोडचा टप्पा पार केला. यानिमित्तानं गिरिजानं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं होतं, सुख म्हणजे नक्की काय असतं’ या आपल्या आवडत्या मालिकेचे आज 700 भाग पूर्ण होत आहेत. आपण या,700 भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार.'


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील जयदीपचा हटके अंदाज; नवा लूक करुन शालिनीला शिकवणार धडा