Khupte Tithe Gupte: छोट्या पडद्यावरील खुप्ते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी तसेच नेते मंडळी हजेरी लावतात. या कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांना अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) हा विविध विषयांवर आधारित प्रश्न विचारतो. नुकताच सोशल मीडियावर खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अवधूत गुप्ते  हा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना काही प्रश्न विचारत आहे.


सुप्रिया सुळे या खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाचा एक प्रोमो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सुप्रिया सुळे या भावूक झालेल्या दिसल्या. आता या कार्यक्रमाचा आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


प्रोमोमध्ये दिसत आहे की, अवधूत गुप्ते  हा सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारतो, "कोण प्रभावी उपमुख्यमंत्री आहेत? अजित पवार की देवेंद्र फडणवीस?"  या प्रश्नाचं सुप्रिया सुळे या "अजित पवार" असं उत्तर देतात. त्यानंतर अवधूत गुप्ते  प्रश्न विचारतो की, "कोणत्या पुतण्याचं आपल्या काका विरोधातील बंड योग्य होतं असं तुम्हाला वाटतं?  धनंजय मुंडे, राज ठाकरे की अजित पवार?" आता या प्रश्नाचं सुप्रिया सुळे काय उत्तर देणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.


पाहा प्रोमो:






राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. आता सुप्रिया सुळे या कार्यक्रमात विविध विषयांवरील मतं मांडताना दिसणार आहेत.  या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे या कोणकोणत्या विषयांबद्दल बोलणार, तसेच अवधूत गुप्ते  त्यांना कोणते प्रश्न विचारणार हे पाहण्यास आता प्रेक्षक उत्सुक आहेत. 


खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी या कलाकारांनी हजेरी लावली होती. खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये कलाकार आणि नेते विविध किस्से तसेच आठवणी देखील सांगतात. आता खुप्ते तिथे गुप्ते  या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Khupte Tithe Gupte: 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये सुप्रिया सुळे झाल्या भावूक; प्रोमोनं वेधलं लक्ष