Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीमधील दोन हिरे म्हणजे दादा कोंडके (Dada Kondke) आणि अशोक सराफ (Ashok Saraf) . या दोघांनी देखील त्यांच्या विनोदी शैलीनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमामधील अशोक सराफ हजेरी लावली. 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमामध्ये अशोक मामांनी दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा दिला.


'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे करते. नुकताच 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मृण्मयी देशपांडे  ही अशोक मामांना म्हणते, ‘मला तुमच्याकडून दादांबरोबरच्या कामाबद्दलच्या अनुभवाविषयी जाणून घ्यायचं आहे.’  त्यानंतर अशोक सराफ हे दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा देतात. 


'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमामध्ये अशोक सराफ सांगतात, "दादा कोंडके यांच्यासोबत मी तीन चित्रपटांमध्ये काम केले. पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, रामराम गंगाराम. माझ्या करिअरमधील मोठा टर्निंग पॉइंट हे दादा कोंडके आहेत. पांडू हवालदारमधील रोलसाठी त्यांनी मला घेतलं. त्यांना माझ्याबद्दल काहीही माहित नव्हतं त्यांना कोणीतरी माझ्याबद्दल सांगितलं की, एक मुलगा आहे तो चांगलं काम करतो.म्हणून त्यांनी मला घेतलं. हजरजबाबी पणा हा त्यांचा मोठा गुण. तुम्ही किती जोक मारले तरी शेवटचा जोक त्यांचाच असायचा. "


पाहा व्हिडीओ:






'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाचा आणखी एक प्रोमो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दिसले की,  सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमामधील स्पर्धक हे अशोक मामांचा आशीर्वाद घेत आहेत. एका स्पर्धकाने अशोक मामांचे पाय दुधाने धुतले. तर दुसऱ्या स्पर्धकानं अशोक मामांचा पाय पुसून घेतला. व्हिडीओमध्ये  'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधील स्पर्धकांना आशीर्वाद दिल्यानंतर अशोक मामा भावूक झालेले दिसत आहेत. 


आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत आणि अशी ही बनवाबनवी या अशोक सराफ यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र