Maharashtrachi Hasyajatra 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या कार्यक्रमातील कलाकार विविध स्किट सादर करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. आता  गणेशोत्सवानिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमनं प्रेक्षकांना खास गिफ्ट दिलं आहे. आता  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सलग आठ दिवस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच  'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमधून या कार्यक्रमाच्या एपिसोड्सची माहिती देण्यात आली आहे.


 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसते की, शोमधील कलकार म्हणतात,  'गणपती बाप्पा मोरया, वाजतगाजत होणार बाप्पाचे आगमन आणि सुरु होणार हास्याचा उत्सव कारण  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' येणार 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर रोज रात्री नऊ वाजता.' 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर  यादरम्यान  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं, गणेशोत्सवानिमित्त खास भेट....! तुमची लाडकी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सलग 8 दिवस! टीव्हीसमोर बसू या, सहकुटुंब हसू या!'






काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या प्रोमोमध्ये दत्तु मोरे, ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौघुले आणि वनीता खरात हे कलाकार दिसले. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  या कार्यक्रमामधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवायला सज्ज झाले आहेत.  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या  कार्यक्रमाची टीम ही काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या  दौऱ्याला गेली होती.  या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडीओ कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.


'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमातील प्रियदर्शिनी इंदलकर, समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात हे कलाकार आपल्या विनोदीशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. तसेच या कार्यक्रमाचे परीक्षण सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक हे करतात. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोड्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 


संबंधित बातम्या:


Prajakta Mali: प्राजक्तानं शेअर केला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील खास व्हिडीओ; म्हणाली, 'लाफ्टर थेरपी...'