Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचा (Ram Mandir) उद्धाटन सोहळा आज पार पडला आहे. अनेक सेलिब्रिटी या सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत गेले आहेत. प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) हे देखील राम मंदिराचा (Ram Mandir) उद्धाटन सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत गेले होते. यावेळी मनोज जोशी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.


काय म्हणाले मनोज जोशी?


मनोज जोशी म्हणाले की, राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याचे वर्णन ते शब्दत करु शकत नाहीयेत. ते म्हणाले,  "मेरे राम आए हैं, जे लोक रामाला आपलं मानतात ते सगळेच लोक आज भावूक झाली आहेत. या सोहळ्याचं कसं वर्णन करु? माझ्याकडे शब्द नाहीयेत. ईश्वराला आपण जेव्हा प्रत्यक्ष पाहतो, तेव्हा आपल्याला काही सुचत नाही. तशीच भावना इथे असणाऱ्या प्रत्येक माणसाची झाली आहे. तसेच टिव्हीवरुन हा सोहळा बघत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची भावना देखील तशीच आहे. यासाठी शब्द नाहीयेत."


मनोज जोशी यांनी नुकताच ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते राम रक्षा स्तोत्र म्हणताना दिसत आहेत. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं,
"श्री राम: शरणं मम ।।"


पाहा व्हिडीओ:






जाणून घ्या मनोज जोशी यांच्याबद्दल


कलापी, गांधी विरुद्ध गांधी,डॉक्टर तुम्ही पण आणि सूर्यवंशी या नाटकांमध्ये मनोज जोशी यांनी काम केलं आहे.  मनोज जोशी यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांनी आभाळमाया आणि होणार सून मी ह्या घरची या मराठी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. तसेच  हेरा फेरी, चुप चुप के, भूल भूलैया, हंगामा, हलचल, धूम या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली. 


राम मंदिराच्या उद्घाटनाला सेलिब्रिटींची मांदियाळी


अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन,  विकी कौशल, कतरिना कैफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित, कंगना रनौत या सेलिब्रिटींनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली. तसेच गायक सोनू निगम आणि शंकर महादेवन यांनी सोहळ्यात काही गाणी देखील गायली. आयुष्मान खुराना, जॅकी श्रॉफ, राम चरण,रोहित शेट्टी आणि दिपिका चिखलिया यांनी देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Ramayana: राम राज्य ते रामायण; रामायणावर आधारित चित्रपट आणि मालिका नक्की बघा