Archana Puran Singh: अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर सध्या अभिनेत्री अर्चना पूरन सिंह  (Archana Puran Singh)  'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show)मधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. अर्चना पूरन सिंह ही या कार्यक्रमाचं परीक्षण करते.अर्चना ही विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोला नेटकरी लाइक्स आणि कमेंट्स करतात. अर्चनानं नुकताच एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोवर एका नेटकऱ्यानं कमेंट करुन तिला ट्रोल केलं. या ट्रोलरला अर्चनानं सडेतोड उत्तर दिलं आहे. 


अर्चना पूरन सिंहनं तिचा पती आणि अभिनेता परमीत सेठीसोबतचा एक थ्रोबॅक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. हा फोटो शेअर करुन अर्चनाने कॅप्शनमध्ये लिहिलं,  "गुगल आम्हाला आठवण करून देत आहे की, आमचे आयुष्य किती चांगले आहे.." फोटोमध्ये अर्चना ही नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे.


नेटकऱ्याची कमेंट



अर्चनानं शेअर केलेल्या या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'महिलेसारखी कमी तर पुरुषासारखी जास्त दिसतेस कपिलचे म्हणणे अगदी बरोबर आहे की तुझे रूप बदलण्यास खूप वेळ लागत असेल.'


अर्चनानं दिलं सडेतोड उत्तर


अर्चनानं  नेटकऱ्याच्या या कमेंटला रिप्लाय दिला,  'एवढ्या लहान वयात तुझी किती वाईट विचारसरणी आहे.तू जर शिक्षण घेतलं  असतं तर कदाचित आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी कसं बोलावं हे कळलं असतं. प्लिज प्रत्येक वयाच्या, शेप आणि साइजच्या महिलांचा आदर करायला शिका. तुम्ही स्वतःच स्त्रीचा आदर करत नाही आणि पुरुषांकडून आदराची अपेक्षा करता.'






1992 मध्ये अर्चना आणि परमीत सेठी यांनी लग्न केलं. दोघांनी मंदिरात गुपचूप लग्न केले होते. हे दोघे आर्यमन आणि आयुष्मान या दोन मुलांचे पालक आहेत.


'कपिल शर्मा शो' मध्ये मोटिव्हेशनल स्पीकर, गायक, तसेच सेलिब्रिटींनी हजेरी लावतात. अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता आहे. 23 एप्रिल  2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली.  कपिल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो.


संबंधित बातम्या


The Kapil Sharma Show : कार्यक्रमातील उरलेलं जेवण घरी घेऊन जाते अर्चना पूरण सिंह! कृष्णा अभिषेकने घेतली अभिनेत्रीची मजा