The Kapil Sharma Show : विनोदवीर कपिल शर्मा (Kapil Sharma) सध्या 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी आपल्या कार्यक्रमांचं प्रमोशन करण्यासाठी येत असतात. 'द कपिल शर्मा'च्या आगामी भागात आकृती कक्कड, शंकर महादेवन आणि शानसह अनेक कलाकार हजेरी लावत असतात. आता नुकत्याच समोर आलेल्या 'द कपिल शर्मा'च्या आगामी प्रोमोमध्ये कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) अर्चना पूरन सिंहची (Archana Puran Singh) मजा घेताना दिसत आहे. 


कृष्णा अभिषेकने धर्मेंद्रच्या गेटअपमध्ये घेतली एन्ट्री


'द कपिल शर्मा'च्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये कृष्णा अभिषेक धर्मेंद्रच्या गेटअपमध्ये एन्ट्री करताना दिसत आहे. तर कीकू शारदा सनी देओल म्हणून मंचावर येतो. दरम्यान अभिषेक कपिल शर्माला म्हणतो,"मी तुला कित्येकदा समजावलं आहे की, विनोदादरम्यान गाणं गात जाऊ नकोस. मंचावर एवढे गायक आहेत". 






अभिषेकने अर्चना पूरन सिंहची घेतली मजा


प्रोमोमध्ये पुढे अभिषेक अर्चना पूरन सिंहची मजा घेताना दिसत आहे. तो जाहीर कार्यक्रमात म्हणतो की,'द कपिल शर्मा'च्या कार्यक्रमातील उरलेलं जेवण अर्चना घरी घेऊन जाते". अभिषेक पुढे म्हणतो की, अर्चना आता घरी कॉल कर आणि आपल्यासाठी जेवण पाठवायला सांग". त्यानंतर कीकू शारदा म्हणजे,"आजच्या पाहुण्यांसाठीचं जेवण अर्चनाच्या घरुन येणार". पुढे कृष्णा म्हणतो की, आज खूप पाहुणे आल्यामुळे अर्चना जेवण घरी घेऊन जाऊ शकत नाही". 


'या' कारणाने कृष्णा अभिषेकने सोडलेला 'द कपिल शर्मा' शो


कृष्णा अभिषेकने गेल्या काही दिवसांपूर्वी 'द कपिल शर्मा' शो सोडला होता. पण आता त्याने पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अपेक्षित पैसे मिळत नसल्याने त्याने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला होता. तर अर्चना पूरन सिंह गेल्या काही दिवसांपासून 'द कपिल शर्मा' शोचा भाग आहे. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


संबंधित बातम्या


The Kapil Sharma: मंदाकिनीवर तिच्या वडिलांनी गोळी झाडली होती? राम तेरी गंगा मैली फेम अभिनेत्रीनं द कपिल शर्मा शोमध्ये सांगितला 'तो' किस्सा