Bigg Boss Marathi Season 5 : पहिल्या दिवसापासून घरातील दोन व्यक्तींची जोरदार चर्चा होती. अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) या दोन नावांमुळे बिग बॉसचा (Bigg Boss Marathi new Season) प्रत्येक आठवडा गाजला होता. त्यांच्या वागण्यावर प्रेक्षकांमधूनही नाराजीचे सूर उमटत होते. तसेच वारंवार या दोघांनाही घराबाहेर काढण्याची विनंती प्रेक्षकांकडून केली जात होती. पण आता अरबाज पटेल घराबाहेर पडला असून त्याचा खेळ आता संपला आहे. 


दरम्यान अरबाज बाहेर पडताना निक्की अगदी ओक्साबोक्शी रडू लागली. कारण घरात निक्कीला अरबाजशिवाय कुणीच आधार नव्हता. घरातील कुणालाच निक्कीचं वागणं पटत नाही. पण अरबाज आणि निक्कीचे सूर घरात चांगले जुळले होते. पण आता अरबाज घराबाहेर गेल्यामुळे निक्कीचा महत्त्वाचा आधार गेला आहे. 


बिग बॉसने सांगितला निर्णय 


दरम्यान या आठवड्यात रितेश भाऊ नसल्यामुळे बिग बॉसकडून एलिमिनेशनची प्रक्रिया पार पडली. या आठवड्यासाठी अरबाज पटेल, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर हे कलाकार नॉमिनेट होते. त्यामध्ये प्रत्येक सदस्यासमोर एक बॅग ठेवली होती. त्यामध्ये सेफ असं कार्ड ठेवण्यात आलं होतं. यामध्ये सूरज, जान्हवी आणि वर्षाताई हे तिघेजण सेफ झाले. पण निक्की आणि अरबाज डेंजर झोनमध्ये होते. यामध्ये अरबाजचा खेळ संपला असल्याचं बिग बॉसने जाहीर केलं. 


संग्राम चौघुले बिग बॉसच्या घराबाहेर


दोन आठवड्यापूर्वी संग्राम चौघुलेने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. पण मागच्या आठवड्यातील एका टास्कदरम्यान अरबाज आणि संग्रामध्ये झालेल्या झटापटीमध्ये संग्रामच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव संग्रामला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. इतकच नव्हे तर सध्या रुग्णालयात संग्रामवर उपचार सुरु आहेत. 


दोन सदस्य घराबाहेर 


या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धकांनी निरोप घेतला आहे. त्यामुळे आता घरातली स्पर्धा दिवसागणिक उत्कंठावर्धक होत चालली असल्याचं पाहायला मिळतंय. इतकचं नव्हे तर बिग बॉसचा 100 दिवसांचा खेळ 70 दिवसांतच संपणार असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यामुळे येत्या 6 ऑक्टोबर रोजी बिग बॉसचा खेळ संपणार असल्याचंही म्हटलं जातंय. 


ही बातमी वाचा :                                                   


Sangram Chougule : अरबाजसोबतची कुस्ती महागात पडली, वैद्यकीय कारणामुळे संग्राम घराबाहेर; दोनच आठवड्यात खेळ संपला