Sharad Upadhye in Bigg Boss Marathi New Season : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या संग्राम चौघुलने (Sangram ) वैद्यकीय कारणामुळे घराचा निरोप घेतला. त्यातच बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर पडणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. असं सगळं असतानाच कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. पण ती पोस्ट काहीच मिनिटांत डिलीट करण्यात आली.
कलर्स मराठी वाहिनीकडून राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्या एन्ट्रीची पोस्ट करण्यात आली होती. पण ही पोस्ट काहीच मिनिटांत डिलीट करण्यात आली. दरम्यान आता शरद उपाध्ये यांची एन्ट्री बिग बॉसच्या घरात होणार की नाही असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
शरद उपाध्ये घेणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री?
कलर्स मराठीकडून काही वेळापूर्वी शरद उपाध्ये यांचा फोटो शेअर करण्यात आला होता. त्यावर म्हटलं होतं की, सगळ्यांचीच राशीचक्र फिरणार...शरद उपाध्ये बिग बॉस मराठीच्या घरात येणार. त्यामुळे शरद उपाध्ये घरातील सदस्यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. पण आता ही पोस्ट डिलीट झाल्यामुळे नेमकं काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
अरबाज जाणार का घराबाहेर?
बिग बॉसकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस घरातल्या स्पर्धकांना सांगतात की, आता वेळ आली आहे, एलिमिनिनेशनची.त्यामध्ये घरातल्या सदस्यांसमोर बॅग ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये सेफची पाटी ठेवण्यात आलेली आहे आणि एका स्पर्धकाला दुसऱ्या सदस्याची बॅग उघडायची आहे. यामध्ये जान्हवी, सूरज आणि वर्षाताई हे सदस्य सेफ होतात. त्याचप्रमाणे निक्की आणि अरबाज हे डेंजर झोनमध्ये जातात. जेव्हा बिग बॉस निर्णय सांगतात, तेव्हा निक्की अरबाजच्या गळ्यात पडून रडते. त्यामुळे आता या दोघांपैकी कुणाचा खेळ संपणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
संग्राम चौघुले बिग बॉसच्या घराबाहेर
दोन आठवड्यापूर्वी संग्राम चौघुलेने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. पण मागच्या आठवड्यातील एका टास्कदरम्यान अरबाज आणि संग्रामध्ये झालेल्या झटापटीमध्ये संग्रामच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव संग्रामला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. इतकच नव्हे तर सध्या रुग्णालयात संग्रामवर उपचार सुरु आहेत.