Anupamaa upcoming twist: अभिनेत्री रुपाली गांगुलीच्या (Rupali Ganguly) 'अनुपमा' (Anupamaa) या लोकप्रिय शोमध्ये  अनुज आणि अनुपमाच्या ब्रेकअपला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अनुपमा आणि अनुज यांनी त्यांच्या नात्याबाबत निर्णय घेतला आहे. दोघांनी सर्व गैरसमज त्यांनी दूर केले आहेत. अनुज आणि अनुपमा यांनी निर्णय घेतला आहे की, ते कधीही घटस्फोट घेणार नाहीत. परंतु ते सध्या एकत्र राहू शकत नाहीत.  माया ही सध्या अनुजला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. ती अनुजला अनुपमाला घटस्फोट देण्यास सांगते.हे ऐकून अनुज आणि अनुपमा दोघांना मायाचा खूप राग येतो.  अनुपमा या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये अनुज आणि अनुपमा यांच्या  नात्यात आणखी कोणते ट्वीस्ट आणि टर्न्स येतात? हे पाहणे रंजक ठरणार आहे. 


अनुपमा मालिकेतील काव्या ही गरोदर आहे आणि वनराजला अजून त्याची माहिती नाही. हे सत्य फक्त अनुपमालाच माहीत आहे. अनुपमाने काव्याला वनराजला याची माहिती देण्यास सांगितले. समरच्या लग्नाच्या वेळी काव्या वनराजला संपूर्ण सत्य सांगेल, असा अंदाज लावला जात आहे. 






अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काव्या ही वनराजला लवकरच गुडन्यूज देणार आहे. आता शोच्या आगामी एपिसोड्समध्ये किती गदारोळ होणार आहे? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. काव्यानं प्रेग्नन्सीबाबत सांगितल्यानंतर वनराज कशी रिअॅक्शन देतो? हे पाहणे मनोरंजक असेल कारण वनराजला पुन्हा कधीही वडील व्हायचे नव्हते. वनराजने काव्याला आधीच सांगितले होते की, त्याला आणखी मुले नको आहेत.


'अनुपमा' या मालिकेचा प्रीमियर 13 जुलै 2020 रोजी झाला होता. गेली तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  रोमेश कालरा हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते.


अनुपमा मालिकेची स्टार कास्ट


अनुपमा या मालिकेमध्ये रुपाली गांगुली ही अनुपमा ही भूमिका साकारते तर वनराज ही भूमिका सुधांशू पांडे हा साकारतो. गौरव खन्ना हा या मालिकेत अनुज ही भूमिका साकारतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Anupamaa: अनुपमा आणि अनुज पुन्हा एकत्र?, मालिकेला येणार रंजक वळण