Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेमध्ये विविध ट्वीस्ट येत असतात. या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही स्वराज ऊर्फ स्वराची आई आणि मल्हारची पहिली पत्नी वैदेहीसारखी दिसते. नुकताच 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मंजुळा ही स्वराजला लावणी शिकवताना दिसत आहे. 


'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  स्वराज मंजुळाला म्हणतो, 'लावणी तर मुलीच गातात ना?' यावर मंजुळा म्हणते, 'आपलं लोक संगीत खूप समृद्ध आहे. यामध्ये भारुड आहे, गवळण आहे. हे सगळे आपल्या लोकपरंपरेचे रुपं आहेत. हे बाईचं हे पुरुषाचं, असं यात काही ठरलेलं नसतं. मनातील भाव खरे असतील आपलं संगीत हे ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचतं. संगीत हे फक्त संगीत असतं सगळ्यांनी संगीताचा आनंद घ्यायचा असतो.' त्यानंतर मंजुळा ही पिंजरा चित्रपटातील तुम्हावर केली मी मर्जी बहाल ही लावणी स्वराजसमोर गाते. स्वराज देखील लावणी गायला लागतो. 


मंजुळा आणि स्वराज यांची लावणी ऐकल्यानंतर पिहू आणि मोनिका या चिडतात. आता मोनिका ही मंजुळाला रागावते का? पिहूला देखील मंजुळा गाणं शिकवते का? हे प्रेक्षकांना 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या पुढच्या भागात समजेल. 


पाहा प्रोमो: 






तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काही महिन्यांपूर्वी वैदेहीचा मृत्यू झाला. वैदेही ही मल्हारची पहिली पत्नी आणि स्वरा ऊर्फ स्वराज आई होती. वैदेहीच्या मृत्यूनंतर आता वैदेही सारख्या दिसणाऱ्या मंजुळाची काही दिवसांपूर्वी मालिकेत एन्ट्री झाली आहे. 


तुझेच मी गीत गात आहे  या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो. तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकरनं साकरली होती. आता ऊर्मिला ही या मालिकेतील मंजुळा ही भूमिका साकारत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा आणि मल्हार येणार समोरासमोर; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो पाहिलात?