14 Years Of Pavitra Rishta: छोट्या पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) ही मालिका 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं (Sushant Singh Rajput) मानव ही भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री अंकिता लोखंडेनं (Ankita Lokhande) अर्चना ही भूमिका साकारली. या मालिकेला 14 वर्ष झाली आहेत. यानिमित्तानं अंकितानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये अंकितानं सुशांतचा उल्लेख केला नाही, त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
अंकिताची पोस्ट
अंकितानं 'पवित्र रिश्ता' या मालिकेचा एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अंकिता ही वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अंकितानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं,पवित्रा रिश्ताची 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. मी अर्चना होऊ शकते, असा माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल एकता कपूरचे आभार. अर्चना म्हणून मला नवीन ओळख दिल्याबद्दल धन्यवाद. मला अजूनही लोक अर्चना नावानेच ओळखतात. मी खूप कृतज्ञ आहे.'
अंकितानं अजून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'पवित्र रिश्ता' या मालिकेचे 'आसमान मे जब तक सितारे रहेंगे ' हे टायटल साँग ऐकू येत आहे.
नेटकऱ्यांनी केलं अंकिताला ट्रोल
अंकितानं तिच्या सोशल मीडियावरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या पोस्टमध्ये सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख न केल्यानं काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं अंकिताच्या पोस्टला कमेंट केली, 'सुशांतचा उल्लेखही केला नाही. सुशांतचा एकही फोटो शेअर केला नाही. अंकिता मॅडम तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'सुशांतची आठवण आली.'
14 जून 2020 रोजी सुशांत हा त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. सुशांतच्या मृत्यूनं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता.
इतर महत्वाच्या बातम्या: