Anupamaa Spoiler Alert: अनुपमा (Anupamaa) शोमध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत आहेत. गुरुमा या समर आणि डिंपीच्या लग्नासाठी शाह कुटुंबाच्या घरी हजरे लावतात आणि अनुपमाला अमेरिकेतील त्यांच्या गुरुकुलची उत्तराधिकारी म्हणून घोषित करतात. जाणून घेऊया अनुपमा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय दाखवण्यात येणार आहे...


अनुपमा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात येणार आहे की, लीला ही वनराजला सांगेल की हसमुख निघून गेला, त्यानंतर वनराज लीला हिला सांगेल की त्याच्या मित्राला हृदयविकाराचा झटका आला, म्हणून जावे लागले. सर्वजण हॉलमध्ये जमतात आणि अनुजच्या सरप्राईजची वाट पाहत असतात. अनुपमाला गुरुमाशी बोलताना पाहून लीलाला हेवा वाटेल आणि ती म्हणेल की गुरुमा इंग्लंडची राणी असल्याप्रमाणे वागत आहे आणि अनुपमा तिची दासी आहे, असं वाटत आहे.


अनुपमा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात येणार आहे की, अनुज आणि अंकुश एका खास पाहुण्याच्या आगमनाची घोषणा करतात. अनुपमा मालिकेच्या या एपिसोडमध्ये गायक कुमार सानू यांची एन्ट्री होणार आहे. 






कुमार सानू येतात आणि दिल है कि मानता नहीं..  हे गाणं गातात.  त्याच्या परफॉर्मन्सनंतर, अनुपमाने हे गाणे गायल्याबद्दल त्यांचे आभार मानते. त्यानंतर कुमार सानू हे  तेरे इश्क में नाचेंगे.. हे गाणं गातात. या गाण्यावर अनुपमा, अनुज  डान्स करतात. 


अनुपमा (Anupamaa) या मालिकेमध्ये रुपाली गांगुली ही अनुपमा ही भूमिका साकारते तर वनराज ही भूमिका सुधांशू पांडे हा साकारतो. गौरव खन्ना हा या मालिकेत अनुज ही भूमिका साकारतो. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अनुपमा या लोकप्रिय मालिकेचा मराठीतही रिमेक करण्यात आला आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) असे या मालिकेचे नाव आहे. 






महत्त्वाच्या इतर बातम्या:


Anupamaa Spoiler: डिंपलच्या आईनं केलं अनुपमाचं कौतुक; 'अनुपमा' मालिका रंजक वळणावर!