Anupama Serial Latest Update Know Details : रुपाली गांगुली आणि गौरव खन्नाची 'अनुपमा' (Anupama) ही मालिका सध्या चर्चेत आहे. दिवसेंदिवस या मालिकेतील रंजक वळणे प्रेक्षकांना थक्क करत आहेत. मालिकेत अनुपमा आणि अनुजने आता एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे माया अनुजला अनुपमापासून घटस्फोट घेण्यास सांगत आहे. 


'अनुपमा' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार? (Anupama Serial Todays Episode Spoiler)


मायाच्या बोलण्याचा अनुजला खूप राग आला आहे. दरम्यान अनुपमा सर्वांसमोर जाहीर करते की, माझे आणि अनुजचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. पण तरीही अनुज आणि अनुपमाच्या मनात एकमेकांबद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा आहे. त्यामुळेच 'अनुपमा' मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. 


अनुजला त्याचं प्रेम न मिळाल्याचं दुःख आहे. अंकुशसोबत बोलताना अनुज म्हणाला की,"अनुपमा' माझ्यापासून दुरावली याचं मला दु:ख आहे. पण अनुपमाला सर्व खरं सांगितल्याचा आनंद आहे". त्यावेळी अनुजला समजावत अंकुश म्हणतो म्हणतो की,"प्रत्येक लव्हस्टोरीचा शेवट गोड होत नाही. काही लव्हस्टोरी अपूर्णच राहतात". 






छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत 'अनुपमा' या मालिकेची गणना होते. गेल्या काही दिवसांत अनुज आणि अनुपमाचं नातं बहरलेलं दिसून आलं आहे. मालिकेतील या रोमॅंटिक वळणाचा टीआरपीवर चांगला परिणाम झाला आहे. या आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टमध्ये ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 2.9 रेटिंग मिळाले आहे. 


'अनुपमा' (Anupama) या मालिकेत रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि गौरव खन्ना (Gaurav Khanna) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. रुपाली या मालिकेत अनुपमाच्या भूमिकेत तर गौरव अनुजच्या भूमिकेत आहे. या लोकप्रिय मालिकेचा मराठीतही रिमेक करण्यात आला आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) असे या मालिकेचे नाव आहे. गेल्या काही दिवसांत ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. मराठी मालिकाविश्वातही टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेने बाजी मारली आहे. 


संबंधित बातम्या


Anupama Serial Spoiler : 'अनुपमा' रंजक वळणावर! अनुपमा आणि अनुजचं नातं पुन्हा बहरलं; दोघांच्या सुखात माया टाकणार मिठाचा खडा